भारताने पाकिस्तान सोबत खेळावं- सेहवाग

पाकिस्तान विरुद्ध २००४ मध्ये मुलतान येथे ३०९ धावा करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकवणाऱ्या सेहवागने पाकिस्तानसोबत खेळावं का यावर वक्तव्य केलं आहे.

Updated: Nov 14, 2017, 01:11 PM IST
भारताने पाकिस्तान सोबत खेळावं- सेहवाग title=

नवी दिल्ली : पाकिस्तान विरुद्ध २००४ मध्ये मुलतान येथे ३०९ धावा करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकवणाऱ्या सेहवागने पाकिस्तानसोबत सामना खेळला पाहिजे असं देखील म्हटलं आहे. पण यामध्ये सरकार अंतिम निर्णय घेईल.

सेहवाग म्हणतो की, 'सरकारने याबाबत निर्णय घ्यावा पण माझं वैयक्तीम मत आहे की भारताने पाकिस्तान सोबत खेळलं पाहिजे.' सेहवागच्या या वक्तव्याने आता त्याचा विरोध होऊ शकतो. पण याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. सरकार सध्या तरी असा कोणताही निर्णय घेणार नाही असं दिसतंय.

कोहलीबाबत केला मोठा खुलासा

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सेहवागने म्हटलं की, कर्णधार हा संघाचा सर्वेसर्वा असला तरी त्याची भूमिका ही फक्त मत देण्यासाठीच असते.

कोचसाठी कोहलीचं होतं समर्थन

विराट कोहलीचं समर्थन असतांना ही सेहवागला कोच नाही बनवलं गेलं असं मत सेहवागने वर्तवलं आहे. कर्णधारचा टीमशी संबंधित विविध निर्णयांवर प्रभाव असतो पण त्याचा निर्णय अंतिम नसतो. कर्णधाराची भूमिका प्रशिक्षक आणि निवडीमध्ये नेहमी अभिप्राय देणे आहे. विराट कोहलीची इच्छा होती की मला भारतीय संघाचं प्रशिक्षक बनवावे. जेव्हा कोहलीने संपर्क केला तेव्हा मी अर्ज केला पण मी कोच नाही बनू शकलो. अशात तुम्ही कसे म्हणू शकता की प्रत्येक निर्णय कर्णधाराच्या हातात असतात.