त्रिनिदाद : टीम इंडिया रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. कर्णधार शिखर धवनला तीन सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी टीमच्या खेळाडूंकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय टीमने पहिला एकदिवसीय सामना 3 रन्सने जिंकला. अशातच दुसरा सामनाही जिंकल्यावर भारत कॅरेबियन भूमीवर सलग दुसरी वनडे मालिका जिंकणार आहे.
दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो.
पहिला एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने तीन वेगवान गोलंदाज खेळवले होते, त्यापैकी युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण हा एकमेव वेगवान गोलंदाज होता ज्याला विकेट घेता आली नव्हती. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने 10 ओव्हर टाकली आणि 6.20 च्या इकॉनॉमीने 62 रन्स दिले. गेल्या 4 वनडेत त्याने फक्त 2 विकेट्स घेतल्या आहेत, अशा स्थितीत धवन त्याला दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर ठेवू शकतो.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेलचा अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. अक्षर पटेल या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. तो 21 चेंडूत 21 रन्सचं करू शकला. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 सिक्स मारला. शिवाय गोलंदाजीमध्येही तो एकही विकेट घेऊ शकला नाही. गेल्या काही सामन्यांपासून त्याची ही खराब कामगिरी कायम आहे, अशा परिस्थितीत अक्षरला प्लेइंग 11 मधूनही बाहेर बसावं लागू शकतं.
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, आवेश खान.