India vs South Africa 2nd Test | दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय

Ind vs Sa, Ind vs Sa 2nd Test Match, K L Rahul, wanderers stadium johannesburg, johannesburg, Ajinkya Rahane, Cheteshwar Pujra,   

Updated: Jan 6, 2022, 10:09 PM IST
India vs South Africa 2nd Test | दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रकिने दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर 7 विकेट्सने (India vs South Africa 2nd Test)  शानदार विजय मिळवला आहे.  टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले होते. आफ्रिकेने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 1-1 ने बरोबरी साधली. (ind vs sa 2nd test day 4 south africa beat team india by 7 wickets at the wanderers stadium johannesburg) 

डीन एल्गरची कॅप्टन्सी इनिंग 

आफ्रिकेकडून कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक नाबाद 96 धावांची खेळी केली. डीनने 188 चेंडूत 10 चौकांराच्या मदतीने ही खेळी साकारली. तर टेम्बा बावुमाने  नाबाद 23 धावा करत डीनला चांगली साथ दिली. 

या व्यतिरिक्त रसी वन डॅर डुसेनने 40 धावांची खेळी केली. तर सलामीवीर एडेन मकरमने 31 रन्स केल्या. तर किगन पीटरसनने 28 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि रवीचंद्रन अश्निव या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला. 

मालिकेत 1-1 ने बरोबरी

दरम्यान आफ्रिकेने हा दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना हा रंगतदार होणार आहे. हा तिसरा सामना 11 जानेवारीपासून  केप टाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया मालिका जिंकत इतिहास रचणार की आफ्रिका वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.