IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना रद्द होणार? क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का

Updated: Oct 6, 2022, 02:17 PM IST
IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना title=

लखनऊ : टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेय एकना क्रिकेट स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर होणार आहे, अशी शक्यता निर्माण झालीय.  

बीसीसीआयने सांगितलं मॅचचं नवीन टाईमिंग 
वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र पावसामुळे खेळाडूंची आणि फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण लखनऊमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे  दिवसभर पावसाची शक्यता असणार आहे. 

बीसीसीआयने (BCCI) सामन्याला उशीर झाल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर होणार आहे. सामन्यापूर्वी मैदानाची पाहणी करण्यात आली. मॅच आणि टॉसची वेळ आता अर्ध्या तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होणार आहे, तर सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.

लखनऊमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता 
Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी हवामान (Weather) खूपच खराब असणार आहे.दिवसभर पावसाची (Rain Prediction) शक्यता 96 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच अधूनमधून पाऊस पडत राहील. तसेच दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यताही 94 टक्क्यांपर्यंत आहे. या अर्थाने, सूर्यप्रकाश देखील दिसणार नाही. त्यामुळे अशा स्थितीत सामना होणे फार कठीण वाटते. 

टॉसला आणखी विलंब होणार
वनडे सामना दुपारी दीड वाजल्यापासून होणार आहे, तर दुपारी एक वाजता मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे झाल्यास नाणेफेकीला आणखी विलंब होऊ शकतो. लखनौमध्ये दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान या सामन्यावर पावसाचे संकट असणार आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

दोन्ही संघ 
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शाम्सी