ईशांत शर्मानं न्यूझीलंडचा निम्मा संघ धाडला माघारी

न्यूझीलंडमध्ये ईशांत शर्माची चांगली कामगिरी

Updated: Feb 23, 2020, 11:17 AM IST
ईशांत शर्मानं न्यूझीलंडचा निम्मा संघ धाडला माघारी  title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये वर्चस्व राखलंय.. न्यूझीलंडनं पहिल्या टेस्टमध्ये 183 रन्सची लीड घेतलीय.. न्यूझीलंडची पहिली इनिंग 348 रन्सवर संपुष्टात आली.. किवींच्य तळाच्या फलंदाजांना रोखण्यासाठी भारतीय बॉलर्सना संघर्ष करावा लागला.. टीम इंडियाच्या ईशांत शर्मानं न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 165 रनवर ऑलआउट झाली. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 348 रन केले आहेत. टीम इंडियावर 183 ची लीड न्यूझीलंडने घेतली आहे. भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट गमवत 124 रन केले आहेत. हनुमा विहारी (7 रन) आणि अजिंक्य रहाणे (13 रन) क्रीजवर आहे.

पृथ्वी शॉ 14 रनवर आऊट झाला आहे. चेतेश्वर पुजारा 11 रनवर, मयंक अग्रवाल 58 रनवर, कर्णधार विराट कोहली 19 रनवर आऊट झाला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने 89 रन, रॉस टेलरने 44 रन आणि काइल जेमिसनने 44 रन केले. ईशांत शर्माने 5 विकेट, अश्विनने तीन तर बुमराह आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.