IND vs NZ 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ) भारतीय संघाचा पराभव झाला आहे. किवींनी दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 155 धावाच करता आल्या. 200 धावांचा पल्ला सहजपणे पार करणारा भारताचा संघ 150 धावांवरच आटोपल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये भारताचे टॉप 3 बॅट्समन फेल गेले. तिन्ही युवा फलंदाजांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी द्विशतक ठोकलेल्या मॅचविनर खेळाडूला दुसऱ्या सामन्यामध्ये डच्चू मिळण्याची शक्यता आहे. (IND vs NZ 2nd T20 Mumbai star player ishan kishan will be OUT from the team in the second match against New Zealand latest marathi Sport News)
शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि ईशान किशन सलामीला आले होते, यामधील ईशान किशनचं (Ishan Kishan) प्रदर्शन मागील काही सामन्यांपासून खराब राहिलं आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्येही ईशानला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने अवघ्या 40 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये 37 तर दुसऱ्या 2 धावा आणि तिसऱ्या सामन्यात अवघी 1 धाव त्याने केली होती.
ईशान किशनला भारतीय संघात संधी दिली जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून खराब प्रदर्शन सुरू राहिलं आहे. ईशान किशनने आतापर्यंत 25 सामने खेळले असून 633 धावा त्याने केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरूद्ध द्विशतक ठोकल्यावर ईशान चर्चेत आला होता मात्र आता खराब फॉर्ममुळे त्याचं संघातील स्थान जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताची युवा खेळाडू पृथ्वी शॉने रणजीमध्ये चमकदार कामगिरी करत संघात कमबॅक केलं होतं. मात्र शुभमन गिल आणि ईशान किशनमुळे त्याला पहिल्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि संघ व्यवस्थापन आता किशनचा फॉर्म पाहता त्याला बाहेर बसवत पृथ्वीला खेळवण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पृथ्वी शॉ भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.