मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव करण्यात भारताला यश मिळालं आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 317 धावांनी शानदार विजय मिळविला.
या विजयात रविचंद्रन अश्विनन रोहित शर्मानं अष्टपैलू कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या दमदार शतकानं भारतीय संघाचा डाव अधिक मजबूत केला. मैदानावर विजयाचा आनंद साजरा करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हा व्हिडीओ पाहून शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माचं आणि विराट कोहलीचं आपापसात काही बिनसलं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली रोहित शर्माच्या कानात काहीतरी सांगताना देखील दिसत आहे.
That winning feeling!
Smiles all round as #TeamIndia beat England in the second @Paytm #INDvENG Test at Chepauk to level the series 1-1.Scorecard https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/VS4rituuiQ
BCCI (@BCCI) February 16, 2021
Aaj mein samjha BCCI ke videos hidden message wale hote hai...that Virat n Rohit handshake says a lot https://t.co/HXSllWga6E
Inscrutable Viki (@inscrutableviki) February 16, 2021
Want to know what Kohli whispered in Ro’s ear because I’m bored and I want to spin some conspiracy theories for fun https://t.co/cp7QsLn2nI
Rangolis (@ragz_93) February 16, 2021
That handshake between Ro n VK describes everything...They are not best of friends but just doing wat is best for team...#ENGvIND #INDvENG @BCCI https://t.co/6R3htOh8Bk
Tuhin dixit (@imtuhindixit) February 16, 2021
या पूर्वी देखील उडालेल्या वावड्या विराट आणि रोहित शर्मा पहिल्यांदीच अशा घटनेनं चर्चेचा विषय ठरले असं नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा त्यांच्यात खटके उडत असावे अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा आणि सोशल मीडियावरून विचारले जाणाऱ्या या प्रश्नावर मात्र कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने देखील अद्याप कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही.
भारतीय संघाकडून या व्हि़डीओ आणि या आधीच्या घटनांपैकी कोणत्याही गोष्टीवर बोलण्याचं टाळलं आहे. हा व्हि़डीओ तुफान व्हायरल तर होतोच आहे मात्र यावर चर्चा देखील रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
दुसर्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मोईन अली बाद झाल्याने इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आला आणि टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.