धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप-चहलची जादू ओसरली, आकडेवारी समोर

 धोनी संघात होता तोपर्यंत कुलदीप-चहलची जोडी सुपरहिट होती 

Updated: Mar 28, 2021, 10:18 AM IST
धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप-चहलची जादू ओसरली, आकडेवारी समोर  title=

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड(IND vs ENG)यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 6 गडी राखून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. दुसर्‍या वनडेमध्ये भारताच्या बॉलर्सची खूप धुलाई झाली. कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) च्या बॉलवर इंग्लडच्या बॉलर्सनी धावांचा पाऊस पाडला. इतकेच नव्हे तर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) टी -20 मालिकेदरम्यान बऱ्याच धावा दिल्या. अशावेळी सर्वांना पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni)ची आठवण आली आहे. धोनी संघात होता तोपर्यंत कुलदीप-चहलची जोडी सुपरहिट होती असं म्हटलं जाऊ लागलंय.

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) खूप धावा दिल्या. या सामन्यात कुलदीपने संपूर्ण 10 षटके टाकली. ज्यामध्ये त्याने 8.40 च्या सरासरीने 84 धावा दिल्या. याशिवाय क्रुणाल पांड्याने 6 षटकांत 72 धावा दिल्या. इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सने कृणालच्या एकाच षटकात तीन षटकार ठोकले. या सामन्यात कृणाल आणि कुलदीप या पराभवाला कारणीभूत ठरले. याशिवाय यजुवेंद्र चहलने टी -२० मालिकेतही बऱ्याच धावा दिल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या 2 सामन्यांसाठी त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले.

एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून कुलदीप आणि चहलची आकडेवारी फारच निराशाजनक दिसतेय. कुलदीप यादवने Kuldeep Yadav) धोनी असताना 47 सामने खेळले. त्यात त्याने दरम्यान, त्याने 91 विकेट घेतल्या. धोनी निवृत्त झाल्यानंतर कुलदीपने 16 सामन्यांत केवळ 14 विकेट घेतल्या. यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) धोनीबरोबर खेळताना 46 सामन्यांत 81 विकेट घेतले. धोनीनंतर चहलने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले. ज्यात त्याच्या नावावर फक्त 11 विकेट आहेत. धोनीच्या नंतर या दोन्ही बॉलर्सची जादू पूर्णपणे ओसरुन गेली आहे.

टीम इंडिया (Team India)ला मालिका जिंकण्यासाठी तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी पराभूत केले. यानंतर इंग्लंडने शानदार पुनरागमन करत दुसर्‍या सामन्याला 6 गडी राखून विजय मिळवला. मालिकेचा तिसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. अशावेळी इंग्लंडला पराभूत करून मालिका जिंकण्याचे आव्हान टीम इंडीयासमोर आहे.