ऋषभच्या हसण्यामुळे फलंदाजाचा उडाला गोंधळ, पाहा मजेशीर व्हिडीओ

ऋषभ पंतचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Updated: Feb 25, 2021, 04:07 PM IST
ऋषभच्या हसण्यामुळे फलंदाजाचा उडाला गोंधळ, पाहा मजेशीर व्हिडीओ title=

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. गुलाबी चेंडूनं डे-नाईट सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. बुधवारी म्हणजेच पहिल्या दिवशी विकेटकीपर ऋषभ पंतचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

विरेंद्र सेहवागनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  विकेटकीपर ऋषभ पंत कायमच मैदानात आपल्या सहकारी खेळाडूंना प्रोत्साहित करताना दिसतो. अशाच एक प्रोत्साहनादरम्यान मजेशीर घटना घडली आणि त्याचा व्हिडीओ समोर आला. 

गल्लीमध्ये किंवा रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना खेळाडू खूप आरडाओरडा करत खेळाडूला संभ्रमात टाकतात तोच काहीसा प्रकार खऱ्या क्रिकेटच्या मैदानातही घडला. ऋषभच्या विचित्र हसण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या गोंधळामुळे फलंदाज संभ्रमित झाला. 

 विकेटकीपर ऋषभ गोलंदाजांना वेळप्रसंगी सल्ला देणंही चुकवत नाही. ऋषभ पंतच्या जुगलबंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ऋषभनं मैदानात केलेल्या गोंधळामुळे फलंदाज संभ्रमित झाला आणि धावा काढण्यासाठी आलेला अर्ध्यावरून मागे परतला. दोन मिनिटं त्याला काय घडलं हे समजलंच नाही.

विरेंद्र सेहवागनं या व्हिडीओला अलटिमेट स्ट्रीट क्रिकेटर असं कॅप्शन देऊन व्हिडीओ शेअर केला आहे. अहमदाबादमध्ये जाहीर झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत विकेटच्या मागे खूप अॅक्टीव्ह होता. 

सेहवागनं इन्स्टावर कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'हा एक संपूर्ण स्ट्रीट क्रिकेटर आहे. #rishabhpant, इतका आवाज काढतो की फलंदाज गोंधळतात. ऋषभ फक्त आपल्या आवाजनंच मैदानात यष्टीरक्षक म्हणून काम करतो.'

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 112 धावांवर बाद झाला. टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 6 बळी घेतले.