IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

India vs Australia 3rd ODI: पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 10 विकेट्सने विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 मार्च म्हणजेच उद्या होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येते. 

Updated: Mar 21, 2023, 12:26 PM IST
IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी  title=
IND vs AUS 3rd ODI

IND vs AUS, Chennai Weather Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 10 गडी राखून सामना जिंकला. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांमधील या मालिकेतील निर्णायक सामना उद्या (22 मार्च) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर येतं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असणार आहे. त्यातच काल (20 मार्च 2023) ला चेन्नईमध्ये जोरदा पाऊस झाला. आजही (21 मार्च 2023) पावसाची शक्यता आहे. परिणामी उद्या म्हणजेच 22 मार्चला होणार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा: घराच्या बाहेर पडण्यापूर्वी चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  

तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर उद्या (22 मार्च 2023) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी हवामान विभागाने मॅचच्या दिवशी दुपारी 12 वाजता 16 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सामन्यादरम्यान आर्द्रता 74 टक्के राहील तर ताशी 13 किमी वेगाने वारे वाहतील. जसाजसा दिवस पुढे सरकेल तसातसा पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याचा एकदिवसीय सामन्या पाऊस खराब करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. 

तिसरा वनडे कधी सुरू होईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना बुधवार, 22 मार्चपासून सुरू होणार असून दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

तिसरा वनडे कुठे खेळला जाईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

तिसरा वनडे कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय थेट प्रक्षेपण करेल. सामन्याचे थेट प्रक्षेपण Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल. थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स चॅनलवर विनामूल्य उपलब्ध असेल.

IND vs AUS

भारत: रोहित शर्मा (क), युझवेंद्र चहल, इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (क) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा