Rishabh Pant: आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 19 रन्सने लखनऊचा पराभव झाला. या पराभवानंतर लखनऊ सुपर जाएंट्सच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा मावळल्या आहेत. अभिषेक पोरेल 58 रन्स आणि ट्रिस्टन स्टब्स नाबाद ५७ या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. दिल्लीचा 14 सामन्यांमधला हा सातवा विजय होता.
दिल्लीचा 14 सामन्यांमधला हा सातवा विजय ठरला. नेट रन रेटमध्ये संघ 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनऊवरील विजयानंतर कर्णधार ऋषभ पंत मात्र काहीसा नाराज असल्याचं पहायला मिळालं. प्लेऑफच्या लढतीतून बाहेर पडल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. सामना जिंकल्याबद्दल त्याने काही खेळाडूंचे कौतुक केलं.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत या विजयानंतर म्हणाला, 'नक्कीच निकोलस पूररने आम्हाला खूप त्रास दिला. आमच्या काही योजना होत्या. आम्ही चांगला स्कोर उभारला होता. आमची गोलंदाजीही चांगली चालली होती. माझ्या मताने या सिझनची सुरुवात खूप अपेक्षांनी झाली. यादरम्यान काही खेळाडू जखमी झाले. मात्र शेवटच्या सामन्यानंतरही आम्ही शर्यतीतच आहोत. जर मी गेल्या सामन्यात खेळू शकलो असतो, तर जिंकण्याची अधिक शक्यता होती.
पंत पुढे म्हणाला की, मला कमबॅक करून खूप छान वाटलं. संपूर्ण भारतातून मिळालेला पाठिंबा पाहून आनंद झाला. दीड वर्षानंतर परतण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. मला सतत मैदानात राहायचं आहे. तसंच आता मला कोणतीही एक्शन मीस करायची नाही.
लखनऊच्या टीमचं नेट रनरेट खूपच खराब आहे. त्याचं रन रेट -0.787 त्यामुळे मुंबईत विजय मिळवल्यानंतरही त्याला प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य होणार आहे. दिल्लीने दिलेल्या 209 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल 5, क्विंटन डि कॉक 12, मार्कस स्टॉय़निस 5 आणि दीपक हुड्डा 0 धावा काढून पव्हेलियनमध्ये परतले. मात्र यावेळी पूरनने एकाकी झुंज दिली. अखेरीस 20 ओव्हर्समध्ये लखनऊच्या टीमला 189 रन्सच करता आले.