Ollie Pope on Ranchi Test: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. यामध्ये टीम इंडियाने 2-1 अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार आहे. रांचीमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या टीमचा उपकर्णधार ओली पोपने मोठं विधान केलं आहे.
इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपच्या म्हणण्यानुसार, चौथ्या टेस्टमध्ये 'टर्न' घेणाऱ्या पीचची कोणतीही अडचण येणार नाही. कारण स्पिनर्सना सुरुवातीपासून मदत मिळाल्यास सामना बरोबरीचा होणार आहे.
हैदराबाद, विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये सर्व टेस्टमध्ये 'स्पोर्टिंग पीच' होत्या. ज्यामध्ये स्पिनर्स आणि वेगवान गोलंदाज तसंच फलंदाजांना अनुकूल होतं. जे प्रामुख्याने स्पिनर्सना अनुकूल नव्हतं परंतु प्रत्येकासाठी काहीतरी वेगळी गोष्ट होती.
पत्रकारांशी बोलताना पोप म्हणाला, “जर पहिल्या बॉलपासून पीचवर स्पिन होत असेल तर टॉसची भूमिका नगण्य होईल. त्यामुळे मैदानावर समान स्पर्धा होईल. अनेकदा विकेट सुरुवातीला सपाट असते पण नंतर ती खराब होऊ लागते. आम्ही प्रथम फलंदाजी करून पहिली टेस्ट जिंकली. गेल्या 2 टेस्टमध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली आणि सामने जिंकले.''
भारताने जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास टीम इंडिया अक्षर पटेलला रूपाने चौथा स्पिन गोलंदाज प्लेईंग 11 मध्ये, असं पोपचं मत आहे. पोपच्या म्हणण्यानुसार, “भारताकडून चौथा स्पिनर खेळवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात ज्यावेळी ते विकेट पाहतील आणि त्यावर सराव करतील, तेव्हाच ते काय करतात हे याची आम्हाला माहिती मिळेल. पीचला इतकं पाणी दिलंय की, आम्हाला भारताकडून अतिरिक्त स्पिनरची अपेक्षा आहे. जसप्रीत नसेल तर अक्षर पटेल त्याचा पर्याय नक्कीच असेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, गस ऍटकिन्सन.