NZ vs AUS Final | ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

 आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना  (Icc t 20 world Final 2021) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे.   

Updated: Nov 14, 2021, 07:23 PM IST
NZ vs AUS Final | ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय  title=

दुबई : टी वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम सामन्याच्या (Icc t 20 world cup Final 2021) लढतीसाठी आता अवघे काही मिनिटं बाकी आहेत. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New zealand vs Australia) आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. (icc t 20 world cup 2021 final match australia captain aaron finch win the toss and chose to field)

दोन्ही संघांची दुबईतील आकडेवारी 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दुबईत पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाने दुबईत 11 सामने खेळले आहेत. यापैकी प्रत्येकी 5 सामन्यात विजय आणि पराभव झाला आहे. तर न्यूझीलंडने 8 मॅच खेळले आहेत. यापैकी 3 वेळा किवींचा विजय झाला आहे. तर 5 मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.  

न्यूझीलंडला अद्वितीय कामगिरीची संधी

न्यूझीलंडला अद्वितीय कामगिरीची करण्याची संधी आहे. न्यूझीलंडने अंतिम सामना जिंकला तर एकाच वर्षात आयसीसीचे दोन्ही स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पहिली टीम ठरेल. तर दुसऱ्या टी 20 फायनलमध्ये खेळणाऱ्या कांगारुही विजेतपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे विश्व विजेता कोण ठरणार याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श,  स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झॅम्पा आणि जोश  हेझलवूड 

न्यूझीलंडचे शिलेदार : केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिल गुप्टील, डेरील मिचेल, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्न, टीम साऊथी, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.