T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा

पैसाच पैसा, जिंकेल त्या संघाला लॉटरीच लागेल...  विजेता संघच नाही तर पराभूत संघानांही मिळणार इतके कोटी रुपये

Updated: Sep 30, 2022, 05:04 PM IST
T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा title=

ICC T20 World Cup Prize Money: ऑस्ट्रेलियात (Australia) 16 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यंदा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत तब्बल 16 संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघाने यासाठी रणनिती आखली आहे. आता आयसीसीने (ICC) टी20 वर्ल्ड कपसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. विजेत्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत.

आयसीसीने केली घोषणा
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2022) विजेत्या संघाला यावेळी तब्बल 1.6 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत जवळपास 13 कोटी 4 लाख रुपये मिळणार आहेत. तर अंतिम स्पर्धेत पराभूत झालेल्या संघाला 800,000 डॉलर म्हणजे जवळपास 6 कोटी रुपये मिळणार आहेत. 

सेमीफायनलमधल्या संघांनाही मिळणार पैसे
इतकंच नाही तर सेमीफायनलमध्ये दाखल होणारे संघही मालामाल होणार आहेत. सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या दोन संघांना 4 मिलिअन डॉलरचं बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय सुपर-12 मध्ये जिंकणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर दिले जाणार आहेत. सुपर-12 मधून बाहेर होणारे संघही रिकाम्या हाताने परतणार नाहीत. पराभूत संघांना प्रत्येकी 70 हजार डॉलर दिले जाणार आहेत. 

स्पर्धेत 16 संघांचा सहभाग
यंदा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत 16 संघांनी सहभागी घेतला आहे. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान क्लालीफाईंग सामने खेळवले जाणार आहेत. क्लालीफाय राऊंडमध्ये श्रीलंका, वेस्टइंडिज, नामिबिया, नेदरलँड, युएई, आर्यलँड, स्कॉटलँड आणि झिम्बाब्वे या टीम खेळणार आहे. मुख्य स्पर्धा 22 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. टॉप 8 संघांमध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश असेल.