दुबई : कोणताही खेळाडूवर जिंकण्यासाठी प्रचंड दबाव असतो. खेळाडू आपली कामगिरी अधिक नेत्रदीपक करण्यासाठी ड्रग्ज किंवा बंदी असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे खेळाडूंच्या वारंवार डोपिंग चाचण्या होत आहेत. ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणार्या बहुतेक खेळांमध्ये डोपिंगची प्रकरणे आढळतात. पण आता क्रिकेटमध्येही डोपिंगची प्रकरणे ऐकायला मिळत आहेत.
या दिग्गज क्रिकेटपटूवर बंदी
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजा (Zubayr Hamza) याच्यावर आयसीसीने शुक्रवारी ऑफ-टूर्नामेंट डोप चाचणीत दोषी आढळल्याने तात्पुरती बंदी घातली आहे. 17 जानेवारी रोजी हमजाच्या डोप चाचणीसाठी नमुना घेण्यात आला होता. फ्युरोसेमाइड या प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला. आयसीसी डोपिंगबाबत अतिशय कडक आहे आणि त्यामुळेच या स्टार खेळाडूवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
Proteas batter Zubayr Hamza is cooperating fully with the ICC after testing positive for a prohibited substance.
Full details: https://t.co/RSBX6GCha2 pic.twitter.com/BJrVpapsCJ
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 23, 2022
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजा याला निलंबित केले आहे. 17 जानेवारी 2022 रोजी केलेल्या तपासणीत तो फ्युरोसाईड सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. शिस्तभंगाची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. हमजावर कारवाई सुरू असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
झुबेर हमजानेही कदाचित आपला गुन्हा मान्य केला असावा कारण या खेळाडूने आयसीसीच्या बंदीच्या निर्णयावर अद्याप कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितले की ते आयसीसीला पूर्ण सहकार्य करत आहेत. त्याने आयसीसीसमोर आपले लेखी म्हणणे नोंदवले असून निलंबनाला सहमतीही दर्शवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानेही यावर कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही.