ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारतीय संघाचा ICC चा झटका

पहिल्या वनडेमध्ये भारताला आणखी एक झटका

Updated: Nov 28, 2020, 06:36 PM IST
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारतीय संघाचा ICC चा झटका title=

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभवानंतर आता भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथम ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघावर मोठा दंड ठोठावला. सर्व भारतीय खेळाडूंना आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने भारतीय संघाला २० टक्के सामना शुल्काचा दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांना असे आढळले की, भारतीय संघाने निर्धारित वेळेत 50 ओव्हर पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे संघाला दंड बसला.

आयसीसीच्या कलम २.२२ नुसार खेळाडू व खेळाडूंच्या साथीदारांना दोषी ठरविण्यात आले आहे. खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो, कारण ते निश्चित वेळेत गोलंदाजी पूर्ण करत नाहीत. कोहलीने ही गोष्ट मान्य केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 29 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्याचबरोबर शेवटचा एकदिवसीय सामना 2 डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे.