मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामातील प्ले ऑफच्या पहिल्या लढतीत आज हैदराबाद आणि चेन्नई आमनेसामने असणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर आज हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा चेन्नई संघ जेतेपदासाठी आतुर आहे. या सामन्यात पराभव होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. हरणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर संघात एलिमिनेटर मॅचमधील विजेत्याशी होणार आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईचा हा नववा हंगाम आहे. नऊही वेळा ते प्ले ऑफमध्ये पोहोचले. चार वेळा चेन्नई फायनलमध्ये पोहोचली होती. तर दोन वेळा चेन्नईच्या संघाने जेतेपद मिळवलेय. चेन्नईने संपूर्ण सीझनमध्ये जबरदस्त कामगिरी केलीये. ते ज्याप्रमाणे या हंगामात खेळत होते त्यानुसार ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातायत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चेन्नई फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करेल. दुसरीकडे एकदा जेतेपद मिळवलेला हैदराबाद संघही दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, शाकिब अल-हसन, मनीष पांडे, कार्लोस ब्रैथवेट, यूसुफ पठान, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, रिक्की भुई, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, टी. नटराजन, मोहम्मद नबी, बासिल थम्पी, के. खलील अहमद, संदीप शर्मा, सचिन बेबी, क्रिस जोर्डन, तन्मय अग्रवाल, श्रीवत्स गोस्वामी, बिपुल शर्मा, मेहेदी हसन और एलेक्स हेल्स.
चेन्नई : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सुरेश रैना, ड्वायन ब्रावो, शेन वाटसन, अंबाती रायुडू, मुरली विजय, हरभजन सिंह, फाफ डु प्लेसिस, सैम बिलिंग्स, दीपक चाहर, लुंगी एनगिदी, के.एम. आसिफ, कनिष्क सेठ, मोनू सिंह, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा, चैतन्य बिश्नोई, कर्ण शर्मा, इमरान ताहिर, शार्दुल ठाकुर, एन. जगादेसन.