Hockey World Cup 2018 : भारतीय हॉकी खेळाडूंना 'ती' म्हणाली, 'Get out from here.....'

क्रीडा विश्वात नाराजी. पण, खेळाडू म्हणतात... 

Updated: Dec 13, 2018, 12:35 PM IST
Hockey World Cup 2018 : भारतीय हॉकी खेळाडूंना 'ती' म्हणाली, 'Get out from here.....' title=

मुंबई : Hockey World Cup 2018  भारतीय हॉकी संघातील खेळाडूना संघाच्याच एका अधिकाऱ्याच्या बेताल वर्तणूकीचा सामना करावा लागला आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि संघातील इतर तीन खेळाडूंची कलिंगा स्टेडियमच्या व्हीआयपी लाऊंजमधून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. 

हॉकी इंडियाच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असणाऱ्या एलेना नॉर्मन हिने भारतीय खेळाडूंशी केलेल्या वर्तनावरुन सध्या क्रीडा विश्वात नाराजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हॉकी विश्वचषकादरम्यान मनप्रीत सिंग, कृष्णन पाठक, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग हे नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा या संघांमघील सामना पाहत व्हीआयपी लाऊंजमध्ये काही चाहत्यांना ऑटोग्राफ देत त्यांच्यासोबत सेल्फीही काढताना दिसले. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडू त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी नसून, दुसऱ्याच ठिकाणी सामना पाहण्यासाठी बसल्याचं पाहून तिचा राग अनावर झाला होता. खेळाडूंना तिथे पाहताच नॉर्मन तेथे आली आणि “Get out from here, how dare you come here… now just shut up and get out”, असं म्हणत तिने थेट शब्दांमध्ये त्यांची हकालपट्टी केली. 

तिचं हे वक्तव्य पाहता क्रीडा विश्वातून अनेकांनीच आता या प्रकरणावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हॉकी इंडियाकड़ून याविषयी कोणतीच प्रतिक्रियाही देण्यात आलेली नाही. मुख्य म्हणजे आपण, तेथील सुरक्षारक्षकाराला उद्देशूनच असं वक्तव्य केल्याचं म्हणत यावर त्यांनी आणखी कोणतीही प्रतक्रिया देण्यास नकार दिला. 

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हा प्रसंग घडला खरा. पण, तो अत्यंत नगण्य प्रसंग अहे, असं म्हणत लाऊंजमध्ये प्रवेश करणं ही खरंतर आमचीच चूक असल्याचं तो म्हणाला. सर्वच संघांना त्या ठिकाणी प्रवेश नसतो. त्यातही आम्ही तेथे गेलो यात आमचीच चूक आहे, असंही तो म्हणाला. 

आपण कोणत्याही दबावाखाली येऊन ही चूक मान्य करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. सोबतच एलेनासोबत आपले कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून, ती आमच्यासोबतच संघाचा एक भाग असल्याची बाबही त्याने यावेळी नमूद केली. मनप्रीतने त्याच्या परिने या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला तरीही खेळाडूंशी करण्यात आलेल्या या वर्तनाविषयी क्रीडा रसिकांनीही नाराजीचा सूर आळवला आहे.