मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. याआधी अनेक आरोप लावल्यानंतर शमीची पत्नी हसीन जहाँने आता आणखी एक केस दाखल केलीये. जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केलाय.
हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केलीये. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी.
हसीनच्या वकिलांच्या मते केसचे गांभीर्य पाहता कोर्टाने यावर लवकरात लवकर सुनावणी द्यावी, कसेच शमीला त्यांची बाजूही मांडण्यास सांगितलेय. दरम्यान, ही केस आपणच जिंकणार असल्याचा विश्वास हसीन जहाँच्या वडिलांना आहे.
हसीन जहाँने मार्चमध्ये शमीविरोधात मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंसारखे आरोप लावले होते. दरम्यान, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हसीन वारंवार शमीवर आरोप करक होती, तिने शमीवर धमकी दिल्याचा आरोपही केला होता. सुरुवातीला शमीला हे प्रकरण शांततेत मिटवायचे होते. मात्र हसीन जहाँ काही ऐकण्यासच तयार होत नाही हे पाहून त्याने कायद्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले.