महिला संघाचे कोच झाल्यानंतर हरेंद्र सिंह म्हणाले...

हरेंद्र सिंह यांची नुकतीच महिला हॉकी संघाचे कोच म्हणून नियुक्ती झाली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 25, 2017, 05:21 PM IST
महिला संघाचे कोच झाल्यानंतर हरेंद्र सिंह म्हणाले...  title=

बंगळूर :  हरेंद्र सिंह यांची नुकतीच महिला हॉकी संघाचे कोच म्हणून नियुक्ती झाली. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "देशाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा असते, त्यांनी कोणतीही भूमिका स्वीकारण्यासाठी तयार राहायला हवे." यापूर्वी त्यांनी कधीही महिला संघाचे कोचिंग केले नव्हते. परंतु, तरी देखील त्यांना महिला संघाच्या कोचची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना पुरुष संघासोबत काम करण्याची अधिक इच्छा होती. गेल्या वर्षी लखनऊमध्ये भारताला ज्युनियर वर्ड कप जिंकून देणारे हरेंद्र यांनी या भूमिकेत देखील समाधान मानले आहे. 

ते म्हणाले, "मला महिला संघाची कोचिंग करताना अभिमान वाटत आहे. हॉकीच्या सर्वोत्कृष्ट कोच यांनी सुरुवातीला महिला संघाचे कोचिंग केले आहे, याचा इतिहास साक्षीदार आहे." पुरुष संघाचे कोचिंग करण्याची संधी न मिळाल्यामुळे तुम्ही निराश आहात का असे विचारताच, ते म्हणाले, "निराश होण्याचा काही प्रश्नच नाही. जर तुम्हाला देशाची सेवा करायची असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची संधी सोडत नाही. उलट त्या आव्हानाचा स्विकार करता."