बापरे! हार्दिक पंड्याने IPL चं इतक्या लाखांचं केलं नुकसान

हार्दिक पंड्यामुळे आयपीएलच्या आयोजकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Updated: Apr 16, 2022, 02:28 PM IST
बापरे! हार्दिक पंड्याने IPL चं इतक्या लाखांचं केलं नुकसान title=

मुंबई : शुक्रवारी गुजरात लायन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने संजू सॅमसनला रॉकेट थ्रो करत आऊट केलं. दरम्यान हार्दिकने केलेला थ्रोमुळे सामन्यातील स्टंपही तुटले. तुम्हाला माहितीये का या LED स्टंप्सची किंमत किती असते. थोडी थोडकी नाही तर या स्टंप्सची किंमत लाखोंमध्ये असते. 

हार्दिक पंड्याने केलेला थ्रो पाहण्यासाठी खप चांगला होता. परंतु तुम्हाला माहित आहे की त्याचे किती नुकसान झाले असेल. 

किती आहे LED स्टंप्सची किंमत

टेक्‍नोलॉजीच्या LED स्टंपच्या सेटची किंमत सुमारे 35 ते 40 लाख रुपये इतकी आहे. आता तुम्हीच अंदाज लावू शकता की, हार्दिक पंड्याच्या थ्रोनंतर आयोजकांचं तसचं आयपीएलचं एकून किती मोठं नुकसान झालं असेल. 

टीमच्या फी इतकी स्टंप्सची किंमत

स्टंप्सच्या एका सेटची किंमत ही मॅचच्या फी इतकी असते. वनडे सामन्यात खेळल्या जाणाऱ्या भारतीय टीमला सुमारे 60 लाख रुपये आणि टी-20 टीमला 33 लाख रुपये मिळतात. तर स्टंपच्या सेटची किंमतही याच्या आसपास आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमातील स्टंपची किंमत सुमारे 40 लाख रुपये होती. टी-20 वर्ल्डकपमध्येही याच स्टंपचा वापर करण्यात आला होता.

LED स्‍टंप्‍स अंपायर्ससाठी फायदेशीर

LED स्टंप अंपायरिंगसाठी फायदेशीर आहेत, या तंत्रज्ञानामुळे, त्याची किंमत देखील खूप जास्त आहे. बेल्समधील मायक्रोप्रोसेसरला हालचालींची जाणीव होते. यासोबतच स्टंपमध्ये उच्च दर्जाच्या बॅटरीही आहेत. त्यामुळे ज्यावेळी चेंडू बेल्सवर लागतो त्यावेळी लाल लाईट दिसते.