Hardik Pandya : शेवटच्या 2 ओव्हर्सचा फुल रिकॅप; पंड्याने असा खेचून आणला विजय

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

Updated: Aug 29, 2022, 08:24 AM IST
Hardik Pandya : शेवटच्या 2 ओव्हर्सचा फुल रिकॅप; पंड्याने असा खेचून आणला विजय title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी दुबईच्या क्रिकेट मैदानावर शानदार सामना रंगला. या सामन्यात अखेर टी-20 आशिया कपच्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारताला 148 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये पलटला सामना 

हा विजय टीम इंडियासाठी सोपा नव्हता, कारण सामना शेवटपर्यंत अडकला होता. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 21 रन्सची गरज होती. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. टीम इंडियाच्या सर्व आशा इथेच पक्की झाल्या होत्या आणि या 2 ओव्हरमध्ये ते आश्चर्यकारक होतं.

पाकिस्तानची 19 वी ओव्हर हरिस रौफने टाकली, त्याने याच ओव्हरमध्ये 14 रन्स लुटले आणि यासह भारताचा विजय निश्चित झाला. या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने तीन चौकार मारले. यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी फक्त 7 रन्सची गरज होती.

19 वी ओव्हर

  • 18.1 ओव्हर- हार्दिक पंड्या 1 रन
  • 18.2 ओव्हर- रवींद्र जडेजा 1 रन
  • 18.3 ओव्हर- हार्दिक पंड्या 4 रन
  • 18.4 ओव्हर- हार्दिक पंड्या 4 रन
  • 18.5 ओव्हर- हार्दिक पंड्या 0 रन
  • 18.6 ओव्हर- हार्दिक पंड्या 4 रन

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर रवींद्र जडेजा बाद झाला. अशा स्थितीत हा सामना पुन्हा पराभवाच्या छायेत जात असल्याचं वाटत होतं. मात्र हार्दिक पंड्या आधीच क्रीजवर होता आणि त्याला साथ देण्यासाठी दिनेश कार्तिक आला. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हार्दिक पंड्याने सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

शेवटची ओव्हर

19.1 ओव्हर- रवींद्र जडेजा विकेट
19.2 ओव्हर- दिनेश कार्तिक 1 रन
19.3 ओव्हर- हार्दिक पंड्या 0 रन
19.4 ओव्हर- हार्दिक पंड्या 6 रन