मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. मात्र ही घाई हार्दिकच्या नव्हे तर त्याचा भाऊ क्रृणालच्या लग्नाची सुरू आहे. आज २७ डिसेंबर रोजी क्रृणाल त्याची गर्लफ्रेंड पंखुडी शर्मासोबत विवाहबद्ध झाला.
क्रृणालच्या लगीनघाईमुळे हार्दीक पांड्या आणि क्रृणाल पांड्या विरूष्काच्या रिसेप्शन सोहळ्यात सहभागी झाले नव्हते.
एकीकडे विरूष्काच्या रिसेप्शन सोहळ्यात सेलिब्रिटींनी आवर्जुन हजेरी लागली होती. अनेकांनी पंजाबी गाण्यांवर ताल धरला. तर दुसरीकडे हार्दीक पांड्याने भावाच्या लग्नात धमालमस्ती केली. मेहंदी, संगीत, साखरपुडा आनी लग्नामध्ये दोन्ही पांड्या भावंडांनी धमालमस्ती केली आहे.
कधी बेली डांस तर कधी भांगडा करतानाचे हार्दिक पांड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्रृणाल आणि पंखुडीचा प्रेमविवाह झाला आहे. 'मी माझ्या चांगल्या मैत्रिणीसोबत लग्न करत आहे. पंखुडीचा माझ्या क्रिकेट खेळण्याला पूर्ण साथ आहे.' अशी माहिती क्रृणालने मुलाखतीदरम्यान दिली आहे.