Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थान

Rohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.

सुरभि जगदीश | Updated: Apr 18, 2024, 08:43 AM IST
Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थान title=

Rohit Sharma: आयपीएल सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याच्या अनेक चर्चा आहेत. रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर तो काहीसा नाराज असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याचा खेळंही यंदाच्या सिझनमध्ये काही फारसा चांगला होत नाहीये. अशातच आता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पंड्याची वर्णी लागणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय.  

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएल सुरु असून त्यानंतर तातडीने टी-20 वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. अशातच हार्दिक पांड्याच्या फिटनेसची चिंता देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत टी-20 वर्ल्डकपसाठी टीमबाबत बैठक झाली.

वर्ल्डकपमधून हार्दिक पंड्याचा पत्ता होणार कट?

वर्ल्डकपबाबत मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सिलेक्टर अजित आगरकर सहभागी झाले होते. या बैठकीत गोलंदाजांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वर्ल्डकप खेळण्याचा मार्ग हार्दिक पांड्यासाठी सोपा नसणार आहे. कारण हार्दिकने गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी दाखवली तरच त्याला टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये स्थान मिळेल, असे संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता एकंदरीत हार्दिक पंड्याचं वर्ल्डकपचं स्थान रोहित शर्माच्या हाती असणार आहे. 

कशी आहे हार्दिकची गोलंदाजी

हार्दिक पांड्याला आत्तापर्यंतच्या 7 सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नाही. याशिवाय कर्णधार म्हणून देखील हार्दिक पांड्या फेल ठरलाय. फलंदाजीत एखादी दुसरी खेळी सोडली तर पांड्याला ऑलराऊंडर म्हणून चमकदार कामगिरी करता आली नाहीये. यामुळे आता पांड्याचा टी-20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट होणार का? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दुसरीकडे पंड्याच्या जागी टीममध्ये कोणाला संधी देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

कसा असेल टीम इंडियाचा संभाव्य संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप अर्शदीप आणि आवेश खान.