पहिलं प्रेम फार कमी लोकांच्या नशीबात असतं; वडिलांसाठी Mitali Raj कडून प्रेमाचा त्याग

वडील आणि प्रेम... या दोघांमध्ये मिताली राजने निवडलं जन्मदात्याला; मितालीचं देखील पहिलं प्रेम कायमसाठी अपूरं राहिलं आहे. क्रिकेटरकडून मोठा खुलासा  

Updated: Dec 3, 2022, 12:00 PM IST
पहिलं प्रेम फार कमी लोकांच्या नशीबात असतं; वडिलांसाठी Mitali Raj कडून प्रेमाचा त्याग title=

Happy Birthday Mitali Raj : आज मुली देखील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. भारत देशाच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. अशाच मुलींपैकी एक म्हणजे क्रिकेटपटू मिताली राज (Mitali Raj). भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची क्रिकेटपटू म्हणजे मिताली. आज मितालीचा वाढदिवस आहे. मितालीच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेवू तिच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्टी. 

प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिलं प्रेम पूर्ण होईलच असं नाही. मितालीचं देखील पहिलं प्रेम कायमसाठी अपूरं राहिलं आहे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मितालीने प्रेमाचा त्याग केला आणि वडील आणि प्रेम... या दोघांमध्ये मिताली राजने जन्मदात्या वडिलांना निवडलं. (Mitali Raj first love)

मिताली राजचं पहिलं प्रेम

मितालीचं पहिलं प्रेम क्रिकेट कधीही नव्हतं. मितालीला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. पण मितालीने क्रिकेटर व्हावं असं तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मितालीने वडिलांची इच्छा पूर्ण केली. मितालीचा भाऊ आणि वडीलही माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. (Mitali Raj first love is dance)

लग्न न करण्याचे कारण
3 डिसेंबर 1982 रोजी जोधपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या मिताली राजने अद्याप लग्न केलेले नाही. इतकं वय असूनही लग्न न होण्याचं कारणही खूप खास आहे. मितालीने एका मुलाखतीत हे गुपित उघड केले आहे. ती म्हणाली, 'खूप पूर्वी मी लहान असताना हा विचार माझ्या मनात यायचा, पण आता जेव्हा मी विवाहित लोकांना पाहते तेव्हा मला मी अविवाहित असल्याचा खूप आनंद वाटतो.' (mithali raj marriage)

मिताली राजने 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले (mithali raj first entry). तेव्हापासून आजतागायत तिच्या बॅटने धावा काढल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार हून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. (mithali raj records)आज मितालीचा आदर्श ठेवून अनेक मुली क्रिकेट विश्वात आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.