नवी दिल्ली : एकीकडे जेथे काही खेळाडू आपलं जीवन खूप आरामात व्यतीत करत आहे. तर दुसरीकडे मात्र काही खेळाडूंचं जीवन विरुद्ध आहे.
स्पेशल ओलिंपिक्स गोल्ड विनर सध्या मजुरीवर काम करत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार स्पेशल ओलिंपिक्स वर्ल्ड समर गेम्स-2015 मध्ये 2 गोल्ड मेडल जिंकणारा राजबीर सिंहला आपली उपजिवीका भागवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे.
भाजप आणि अकाली दल यांच्या पंजाब सरकारने 15 लाख रुपयांचं बक्षीस त्याला जाहीर केलं होतं पण ते त्याला दिलच गेलं नाही. चॅम्पियन सायक्लिस्ट टूर्नामेंटमध्ये 1 आणि 2 किमी सायकिलिंग इवेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा राजबीरला पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी सन्मानित केलं होतं आणि १५ लाख रुपये आणि वेगळे १ लाख असं बक्षीस जाहीर केलं होतं. 10 लाख रुपये केंद्र सरकारकडून बॉन्ड्सच्या रुपात देण्यात येणार होते.
पंजाबचे आताचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे सल्लागार असलेले रवीन ठुकराल यांना याबाबतीत जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला या बाबतीत काही माहिती नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर राजबीरला पूर्ण मदत केली जाईल.'