IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण! वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

IND vs AUS, Glenn Maxwell: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्ध चार सामन्यांची टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. टेस्ट सामन्यात आधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागलं असताना, आता वनडेतही तशीच परिस्थिती होतेय की काय अशी अवस्था आहे.कारण वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे.

Updated: Feb 21, 2023, 09:00 PM IST
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण! वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त title=

IND vs AUS, Glenn Maxwell: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्ध चार सामन्यांची टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. टेस्ट सामन्यात आधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागलं असताना, आता वनडेतही तशीच परिस्थिती होतेय की काय अशी अवस्था आहे.कारण वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे. हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात. (glenn maxwell injured in comeback game ahead of odi series against india ind vs aus) 

ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell)बराच काळापासून दुखापतीने त्रस्त होता. मात्र तो टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागम करण्याची शक्यता होती. मात्र या मालिकेपुर्वीच तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. आधीच टेस्ट सामन्यात अनेक खेळाडूंना दूखापत झाली आहे, त्यात आता वनडे मालिकेआधीही खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढलं आहे. 

स्टार खेळाडूला दुखापत

व्हिक्टोरिया आणि मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन (India vs Australia) अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell)जखमी झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. सामन्यादरम्यान ग्लेन मॅक्सवेलने स्लिपमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो दुखापतग्रस्त झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याचवेळी व्हिक्टोरियन संघ फलंदाजीसाठी उतरला होता मात्र तेव्हा ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) फलंदाजीसाठी आला नाही.या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) दुखापतीमुळे बिग बॅश लीगचा भाग नव्हता. मॅक्सवेलच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे, मात्र भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून तो पुनरागमन करेल, असे मानले जात होते. पण आता पुन्हा दुखापत झाल्याने त्याचे पुनरागमन अवघड वाटतंय. 

ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारताविरुद्ध (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळते आहे. कांगारू संघाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या (India vs Australia) सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे.