Pakistan's Bad Fielding Video : आगामी आशिया कपच्या (Asia Cup 2023) तोंडावर आता सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसत आहे. येत्या 30 तारखेपासून सुरु होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संघासमोर (Pakistan cricket team) टीम इंडियाचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ भयभीत असल्याचं पहायला मिळतंय. आशिया कप सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ सध्या अफगाणिस्तानशी (PAK vs AFG 1st ODI) भिडताना दिसतोय. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानची भंबेरी उडवली. मात्र, हॅरिस रौफने (Haris Rauf) घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत 5 विकेट घेतल्या. मात्र, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची फजेती झाल्याचं पहायला मिळतंय. नेमकं काय झालं ते पाहा...
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 201 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे पाकिस्तान सामना गमावणार की काय? अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, हॅरिस रौफ याने फक्त 6.2 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स नावावर केल्या आणि पाकिस्तानला सामन्यात परत आणलं. त्यानंतर पाकिस्तानने पहिला वनडे 142 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंग पहायला मिळाली. त्यामुळे पाकिस्तानची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. खराब फिल्डिंगचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे.
फखर जमान आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांनी घोडचूक केली. डावखुरा फलंदाज इकराम फलंदाजी करत होता. सामन्याचा 4 थ्या ओव्हरचा पाचवा बॉल खेळवला जात होता. त्यावेळी इकराम स्टाईकवर होता. त्यावेळी नॉन स्टाईक एन्डला गुरबाज होता. इकराम स्ट्राईकवर आला त्यावेळी त्याचा पाचव्या बॉलवर रन घेयची होती. त्यावेळी फटका मारल्यानंतर फिल्डरच्या हातातील बॉल पाहून गुरबाजने धाव घेण्यास नकार दिला. मात्र, तोपर्यंत अर्ध्याहून अधिक क्रीजवर इकराम पोहोचला होता. त्यानंतर इकराम पुन्हा स्ट्राईकच्या दिशेने पळाला. मात्र, तोपर्यंत पाकिस्तानच्या फिल्डिंगचे धिंडोळे निघाले होते.
Pakistan!
..#AFGvPAK pic.twitter.com/UKV17FhvmK
— FanCode (@FanCode) August 22, 2023
हा ना हा ना करत अफिगाणिस्तानची एक विकेट गेली असती. मात्र, फखर जमान आणि किपर मोहम्मद रिझवान यांच्यात चूक झाली. फखर जमानने थ्रो केला खरा, पण रिझवानला कलेक्शन जमलं नाही. त्याच्या हातातून बॉल तर सुटलाच, पण तो स्टंपवर देखील नीट थ्रो करू शकला नाही. त्यामुळे इकरामची विकेट वाचली. त्यानंतर आता पाकिस्ताची फिल्डिंग चेष्टेचा विषय बनू लागली आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतासमोर पाकिस्तानचं तगडं आव्हान असणार आहे. हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह हे तिन्ही गोलंदाज सध्या तगड्या आव्हान असणार आहे. मात्र, अजित आगरकर म्हटल्याप्रमाणे विराट कोहली यांची काळजी घेईल, हे नक्की...