फिफा फुटबॉल : बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का

  फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभवाचा सामना कराला लागला.  

Surendra Gangan Updated: Jun 30, 2018, 09:52 PM IST
फिफा फुटबॉल : बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का title=
Courtesy: Twitter/@Argentina

कझान :  फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभवाचा सामना कराला लागला. फ्रान्सने ४-३ अशा गोलने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले. या पराभवामुळे लिओनेल मेस्सीला मोठा धक्का बसला असून त्याचा जलवा यावेळी पाहायला मिळाला नाही.

अर्जेंटिना आणि फ्रान्स संघात चुरस पाहायला मिळाली. मात्र, फ्रान्स आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दबावाखाली दिसून आला. पहिल्या सत्रात ४१ व्या मिनिटाला डि मारियाने पेनल्टी क्षेत्राबाहेरून व्हॉलीद्वारे केलेल्या अप्रतीम गोलने अर्जेंटिनाला आशेचा किरण दाखवला. १३ व्या मिनिटाला अँटोनी ग्रिझमनने पेनल्टी स्पॉटकिकवर गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली होती.  फ्रान्सच्या आक्रमक खेळामुळे अर्जेंटिना दबावाखाली होता. मात्र त्यांनी संघर्ष कायम राखताना अखेरच्या पाच मिनिटांत बरोबरी मिळवत, आशाचा किरण दिसून आला. 

मध्यंतरनंतर  तिसऱ्च मिनिटाला अर्जेंटिनाने आणखी एक धक्का देताना सामन्यात आघाडी घेतली. लिओनेल मेस्सीच्या पासवर गॅब्रियल मेर्काडोने गोल केला. पण विश्वचषक स्पर्धेत मागील सहा सामन्यांत पहिला गोल केल्यानंतर विजय मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या फ्रान्सने ५७व्या मिनिटाला बेंजामिन पाव्हार्डने कारकीर्दितील पहिला आंतरराष्ट्रीय गोल करताना फ्रान्सला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाला धक्का देत स्तब्ध केले. कॅलिन मॅब्पेने चार मिनिटांच्या फरकाने दोन गोल केले. या १९ वर्षीय खेऴाडूने अर्जेंटिनाच्या बचावफळीला निष्प्रभ केले. त्यामुळे अर्जेंटिनाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.