सुनील छेत्रीच्या आवाहनाला चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Updated: Jun 7, 2018, 03:17 PM IST

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या आंतरखंडीय फुटब़ॉल स्पर्धेतील भारताच्या उर्वरित लढतींची सर्व तिकीट विकली गेली आहेत. आज रात्री आठ वाजता भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत असून १० जूनला अखेरची लढत रंगणार आहे.

मुंबईत रंगणार सामना

अंधेरीतील शहाजी राजे संकुलातील मुंबई फुटबॉ़ल अरेनामध्ये या लढती पार पडणार आहेत. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यानं आम्हाला शिव्या द्या पण लढती पहायला या असं भावनिक आवाहन ट्विटरद्वारे एक व्हिडिओ शेअर करुन केलं होतं. त्यानंतर केनियाविरुद्धच्या लढतीला फुटबॉलप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला होता. भर पावसातही चाहत्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. फुटबॉल लढतींची तिकीट अडीचशेपासून सुरु आहेत.