Qatar FIFA World Cup: सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA 2022) रंगदार सामने पहायला मिळत आहेत. फिफा वर्ल्ड कप गाजतोय तो खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे आणि आगळ्या वेगळ्या घटनांमुळे... फिफा वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशातच पुर्तगाल आणि उरूग्वे (Portugal vs Uruguay) यांच्यातील सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. (fifa world cup 2022 superman with a save ukraine jersey invades pitch with a LGBTQ flag in qatar stadium marathi news)
पोर्तुगाल आणि उरुग्वे (Portugal vs Uruguay, FIFA 2022) यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान रंगीबेरंगी ध्वज घेऊन निळा सुपरमॅन टी-शर्ट घातलेला प्रेक्षक थेट मैदानावर उतरला आणि धावू लागला. त्यावेळी त्याने निळा टी-शर्ट आणि पांढरी हाफ पॅन्ट घातली होती. त्यावेळी त्याच्या हातात एक झेंडा देखील होता. मैदानात उतरताच त्यानं धाव घेतली. धावताना तो झेंडा (LGBTQ) फडकवत होता. सुरक्षारक्षकांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले.
आणखी वाचा - FIFA World Cup : प्रसिद्ध मॉडेलने मोडले अश्लिलतेचे नियम, आता 'ही' शिक्षा होणार?
तरुणाने घातलेल्या टी-शर्टवर 'सेव युक्रेन' असा (Save Ukraine) संदेश लिहिण्यात आला होता. तर शर्टच्या मागील बाजूस 'रिस्पेक्ट फोर ईरानियन वुमैन', असं (Respect for Iranian women) वाक्य लिहिण्यात आलं होतं. तसेच तरुणाच्या हातातील झेंडा हा 'वन लव आर्मबँड'ची निशाणी (LGBTQ) होती. त्यामुळे तरुणाने सामाजित संदेश देण्यासाठी मैदानात उतरण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता.
A guy carrying a Pride flag and wearing a shirt that says "Save Ukraine" on the front and "Respect for Iranian women" on the back just crashed the pitch at the World Cup in Qatar. pic.twitter.com/ShD5Umko2L
— Greg Price (@greg_price11) November 28, 2022
During the game between Portugal and Uruguay at #QatarWorldCup2022 a man ran out on the field wearing a T-shirt that said "Save Ukraine" on the front and "Respect for Iranian Woman" on the back. He was holding an LGBT flag.
Same-sex relationships are criminal offense in Qatar. pic.twitter.com/8ef4koJ3Cp
— Anton Gerashchenko (@Gerashchenko_en) November 28, 2022
दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी तरुणाला पकडून बाहेर नेलं. त्यापूर्वी त्यांनी झेंडा जमिनीवर ठेवला होता. नंतर पंचांनी ध्वज उचलला आणि बाजूला ठेवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तो झेंडा काढून घेतला. हा प्रकार घडल्यानंतर अनेकांनी तरुणाचं कौतूक केलंय. तर काहींनी टीका देखील केली आहे. मात्र, तरुणाचं धाडस पाहून कतार (Qatar) पोलीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.