Fifa World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूट का दिला जातो? जाणून घ्या

Fifa World Cup 2022: गोल्डन बूट देण्याची सुरुवात कधी झाली? विजेता निवडण्याचे नियम काय? 

Updated: Nov 18, 2022, 08:24 PM IST
Fifa World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूट का दिला जातो? जाणून घ्या  title=

Fifa World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता असतानाच आता वर्ल्डकप सुरु होण्याआधीच गोल्डन बूटसाठी (Golden Boot) दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.गोल्डन बूट प्रत्येक वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.मात्र गोल्डन बूटची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंत किती लोकांनी ते जिंकले आहेत, हे जाणून घेऊयात. 

कशी सुरुवात झाली? 

फुटबॉल सारख्या खेळात गोल्डन बूट (Golden Boot) पुरस्कार दिला जातो. हा गोल्डन बूट पुरस्कार अधिकृतपणे 1982 साली सुरू झाला.आधी त्याचे नाव गोल्डन शू होते, पण 2010 मध्ये ते बदलून गोल्डन बूट करण्यात आले.2006 पर्यंत गोल्डन शू या नावाने हा पुरस्कार दिला जात होता. 2010 पासून ते गोल्डन बूट या नावाने दिले जाऊ लागले. 

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये (Fifa World Cup) सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट (Golden Boot) मिळतो. तर त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला सिल्व्हर बूट आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला कांस्य बूट दिला जातो. 

'या' खेळाडूंनी 2010 पासून गोल्डन बूट (Golden Boot) जिंकले 

  • 2010 जर्मनी थॉमस मुलर
  • 2014 कोलंबिया जेम्स रॉड्रिग्ज
  • 2018 इंग्लंड हॅरी केन

दोन खेळाडूंनी सर्वाधिक गोल केल तर...

जर वर्ल्ड कपमध्ये (Fifa World Cup) 2 खेळाडूंनी सारखेच गोल केले असतील तर पुरस्कार कसा ठरवला जातो? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशा परिस्थितीत 1994 मध्ये असा निर्णयही घेण्यात आला होता की, जर 2 खेळाडूंचे गोल्स समान असतील तर ज्या खेळाडूने जास्त गोल करण्यात मदत केली असेल त्याला हा पुरस्कार दिला जातो. याचा विचार करून फिफाची तांत्रिक समिती आपला निर्णय देते आणि विजेत्याची निवड करते. 

दरम्यान फिफा वर्ल्ड कपला (Fifa World Cup) 20 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे फॅन्सना वर्ल्ड कपची उत्सुकता लागली आहे.