FIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

FIFA World Cup 2022 Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांनी धडक मारली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागून आहे.

Updated: Dec 15, 2022, 01:14 PM IST
FIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या title=

FIFA World Cup 2022 Argentina Vs France: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांनी धडक मारली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांचा खेळ पाहता अंतिम सामना अतितटीचा होईल, यात दुमत नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात फ्रान्सच्या कायलिन म्बाप्पेनं 5, अर्जेंटिनाच्या लियोनल मेस्सीनं 5, अर्जेंटिनाच्या ज्युलियन अलवरेझनं 4 आणि फ्रान्सच्या ओलिविर गिरोडनं 4 गोल केले आहेत. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार 18 डिसेंबरला (रविवार) संध्याकाळी 8.30 वाजता होणार आहे. पण स्पर्धेतील दोन्ही संघाचा प्रवास कसा होता? याबाबत जाणून घेऊयात. 

अर्जेंटिनाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं. सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला.

अर्जेंटिना गोल X गोल गोल गोल
नेदरलँड गोल गोल गोल X X

उपांत्य फेरीत क्रोएशिया विरुध्द अर्जेंटिना या सामन्यात अर्जेंटिना 3-0 ने मात मिळवली. अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. वर्ल्डकप इतिहासात अर्जेंटिनाने उपांत्य फेरीतील विजयी घोडदौड कायम ठेवली. 

फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत फ्रान्सनं विजयी सलामी देत ऑस्ट्रेलियाचा 4-1 पराभव केला. त्यानंतर डेन्मार्कला 2-1 ने पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात टुनिसियाकडून 1-0 पराभव सहन करावा लागला. मात्र फ्रान्स बाद फेरीतील सुपर 16 फेरीत स्थान निश्चित केलं होतं. सुपर 16 फेरीत फ्रान्सनं पोलंडचा 3-1 ने धुव्वा उडवला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत उपांत्य फेरीत धडक मारली. डार्क हॉर्स म्हणून चर्चा असलेल्या मोरोक्कोशी उपांत्य फेरीत गाठ पडली. उपांत्य फेीरत फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सनं 2018 चा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. वर्ल्डकप 2018 मध्ये सुपर 16 मध्ये फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 नं पराभव केला होता.