फाफ डु प्लेसिस हा Virat Kohli पेक्षा....; कर्णधार म्हणून कोण ठरलं सरस?

माजी खेळाडूने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: May 29, 2022, 07:36 AM IST
फाफ डु प्लेसिस हा Virat Kohli पेक्षा....; कर्णधार म्हणून कोण ठरलं सरस? title=

मुंबई : भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान नुकतंच संजय मांजरेकर यांनी पुन्हा एक मोठं वक्तव्य केलंय, ज्यामुळे वाद होण्याची चर्चा आहे. संजय मांजरेकर यांनी केलेलं वक्तव्य विराट कोहलीच्या चाहत्यांना रूचणारं नाही.

इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या सिझनच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमने यंदाच्या सिझनमध्ये चांगली कामगिरी केल्याचं मांजरेकर यांनी म्हटलं आहे. शिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिस हा विराट कोहलीपेक्षा चांगला कर्णधार असल्याचंही दिसून येतंय, असं ते म्हणालेत. 

एका वेबपोर्टलशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, "आरसीबीचा हा सिजन गेल्या सिझनपेक्षा थोडा चांगला राहिला. काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, तर फाफ डु प्लेसिस हा विराट कोहलीपेक्षा चांगला कर्णधार दिसून येतोय. त्यामुळे त्याच्याकडून अधिक अपेक्षा आहेत."

आरसीबी आता ज्या टप्प्यावर आली होती तिथून टीमने येऊन जिंकायला हवं होतं. काय चूक झाली आणि कांस्यपदकाऐवजी सुवर्ण जिंकण्यापासून त्यांना कोणत्या गोष्टीने रोखलं हे त्यांना कळेल, असंही मांजरेकर म्हणाले आहेत.

संजय मांजरेकर पुढे म्हणाले, 'बॉलिंग युनिटचे बरेच श्रेय फाफला जातं. याठिकाणी त्याच्या कर्णधारपदाची उत्कृष्ट कामगिरी पाहिली. आरसीबीचा कर्णधारपद कायम ठेवण्यासाठी माझ्या मते तोच योग्य पर्याय आहे."