SA20 faf du plessis : क्रिकेटच्या मैदानात अनेक भावा भावाच्या जोड्या (Brothers in Cricket) पहायला मिळाल्या असतील. अनेक ब्रदर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळले आहेत. त्याची ताजी उदाहरणं आजही पहायला मिळतात. मात्र, तुम्ही कधी भावजी आणि मेहुण्याची जोडी मैदानात खेळताना पाहिलंय का? होय, क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात भावजी आणि मेहुणा आमने सामने आल्याचं पहायला मिळतंय. (faf du plessis century in sa20 league include 36 off 14 balls vs brother in law hardus viljoen)
दक्षिण अफ्रिकेला नव्या उंचीवर पोहोचवणारा फाफ डुप्लेसिस (faf du plessis) आजही त्याच दमात खेळतो. त्याच्या बॅट फ्लो गेल्या अनेक वर्षापासून बदलला नाही. टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये फाफला तोड नाही. दक्षिण अफ्रिकेकडून खेळताना त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. अशाच या 38 वर्षाच्या तरूणाने सध्या सुरू असलेल्या SA20 लीगमध्ये दमदार कामगिरी करत शतक (faf du plessis century) ठोकलं आहे.
जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) आणि डरबन सुपर जायंट्स (Durban Super Giants) यांच्यात सामना खेळला गेला होता. या सामन्यात फाफने धुंवाधार फलंदाजीची कमाल दाखवल 58 चेंडूत 113 धावा कुटल्या. SA20 लीगमध्ये (SA20 League) शतक ठोकणारा फाफ हा पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे फाफने हे शतक मेहुण्याच्या संघाविरुद्ध (JSKvDSG) ठोकलंय. त्यामुळे सध्या फाफच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
The maiden #Betway #SA20 CENTURY has been an absolute delight to witness! Faf du Plessis is a man for the big moments #JSKvDSG | @Betway_India pic.twitter.com/QcZAAYOLU6
— Betway SA20 (@SA20_League) January 24, 2023
दरम्यान, डरबन सुपर जायंट्स खेळणाऱ्या हार्ड्स विल्जोनची (hardus viljoen) बहिण ही फाफ डुप्लेसिसची पत्नी (faf du plessis Wife) आहे. फाफ जोबर्ग सुपर किंग्सकडून खेळतो. त्यामुळे दोन्ही संघ समोरासमोर आल्यावर फाफने वादळी खेळी केली. डुप्लेसीने 194 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. तर मेहुण्या विरोधात त्याने 250 च्या स्ट्राइक रेटने रन्स केल्यात. डुप्लेसीने हार्ड्स विल्जोन च्या 14 बॉलचा सामना केला आणि 36 धावा केल्या होत्या.