IND vs ENG: आता इंग्लंडची खैर नाही...! दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी रोहित सेनेने बनवला खास प्लान!

IND vs ENG: शुक्रवारपासून दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी टीम इंडियाने जोमाने प्रॅक्टिस केली आहे. दरम्यान दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव करण्यासाठी रोहित सेनेने खास प्लॅन आखला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 1, 2024, 10:44 AM IST
IND vs ENG: आता इंग्लंडची खैर नाही...! दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी रोहित सेनेने बनवला खास प्लान! title=

IND vs ENG: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मावर अनेक टीका होताना दिसतायत. शुक्रवारपासून दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी टीम इंडियाने जोमाने प्रॅक्टिस केली आहे. दरम्यान दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव करण्यासाठी रोहित सेनेने खास प्लॅन आखला आहे. 

भारताचे सध्याच्या काळातील फलंदाज स्वीप शॉटसाठी ओळखले जात नाहीत. परंतु इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाच्या खेळाडूंनी नेट सेशनमध्ये स्वीप शॉटचा चांगलाच सराव केला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने स्वीप शॉटची प्रॅक्टिस केली नव्हती. 

पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये इंग्लंडने भारतीय स्पिनविरुद्ध स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा उत्तम वापर केला होता. सुरुवातीच्या नेट सेशनमध्ये शुभमन गिल स्वीप आणि रिव्हर्स स्वीप या दोन्हीचा सराव करताना दिसला. गिल हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे जवळपास सर्वच शॉट्स आहेत, पण सिरीजच्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला साजेसा खेळ करता आला नव्हता. 

रजत पाटीदारनेही केला खास शॉर्टचा सराव

शुक्रवारपासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात पदार्पण करण्याचा दावेदार मानल्या जाणाख्या रजत पाटीदारनेही स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा सराव केला आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड या शॉर्टविषयी बोलताना म्हणाले, 'हे (स्वीप आणि रिव्हर्स स्वीप) असे शॉर्ट आहेत, ज्यांचा तुम्ही प्रयत्नही करू शकत नाही. त्यांचा सराव करणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जास्त शॉट्स असतील तर ते फायदेशीर आहे. 

दरम्यान सरफराज खान की रजत पाटीदार यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल, असा सवाल जेव्हा विक्रम राठोर यांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. राठोर म्हणाले की, 'हा खूप अवघड निर्णय आहे. दोघांनी डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मात्र, कोणाला संधी द्यावी याची निर्णय हा पूर्णपणे कॅप्टन आणि हेड कोच यांच्यावर अवलंबून आहे.

टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.