दुखापतीनंतर रस्त्यावर फिरताना दिसला विराट कोहली, पाहा VIDEO

पहिला वन डेमधून दुखापतीमुळे आऊट, लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसला कोहली  

Updated: Jul 12, 2022, 05:22 PM IST
दुखापतीनंतर रस्त्यावर फिरताना दिसला विराट कोहली, पाहा VIDEO title=

नवी दिल्ली : टी 20 सीरिजनंतर आता वन डे सीरिजही खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली टीममधून बाहेर झाला. 

विराट कोहलीला दुखापत झाल्याने तो वन डे सीरिजमधील पहिला सामना खेळू शकणार नाही. विराट कोहली लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे. दुखापत झाली असताना आराम करायचा सोडून लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे. 

विराट कोहली चिमुकलीला घेऊन लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यात आली. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर सपशेल फ्लॉप ठरला आहे. असं असताना आता दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर आराम करण्याऐवजी बाहेर फिरताना दिसत आहे.

विराटला खरंच दुखापत झाली आहे का? असा प्रश्नही काही क्रिकेटप्रेमींनी उपस्थित केला आहे. गेल्या काही काळापासून विराट कोहली वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी इतर खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणी काही क्रिकेटप्रेमींनी जोर लावून धरली आहे.