Boxer Isiah Jones: क्रीडाविश्वाला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं एका लोकप्रिय खेळाडूचा अंत पाहून अनेकजणांना धक्काच बसला आहे. हा खेळाडू म्हणजे अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसियाह जोन्स (Isiah Jones). बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भल्याभल्यांना धूळ चारणाऱ्या जोन्सला कुटुंबातील वादापुढे मात्र हार पत्करावी लागली. ज्याचं नाव ऐकून मोठमोठ्या बॉक्सर्सनाही कापरं भरत होतं त्यानं वयाच्या 28 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला.
इसिया जोन्सचा (Isiah Jones) त्याच्या भावानंच घात केला. सूत्रांच्या माहितीनुसार कौटुंबीक वादातूनच इसियाच्या भावानं त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मिशिगनमधील डेट्रॉइट इथं ही हादरवणारी घटना घडली.
सदर भागात कौटुंबीक वादातून एका व्यक्तीनं स्वत:च्याच भावाचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तेव्हाच आघाडीच्या बॉक्सरचा इथं करुण अंत झाल्याची बाबप उघडकीस आली.
Isaiah Jones (9-7-0) is a Pro Boxer out of Detroit, Michigan, a fellow member of Soul City Boxing and Wrestling Gym, our last fight was against Roy jones jr Promotion Team! Isaiah, Lost his life yesterday in a tragic event! Please keep his family in your prayers @trboxing pic.twitter.com/ekZQRxcUir
— Roshawn Jones (@Roshawn_Jones) September 20, 2022
पोलिसांनी लगेचच याप्रकरणी तक्रार दाखल करन घेतली आणि कारवाई सुरु झाली. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या क्षेत्राविषयी उत्सुकता असणाऱ्या अनेकांनाच हे सुरुवातीला खरं वाटलं नाही.
कमी वयातच प्रसिद्धीझोतात आला
इसियानं फार कमी वयातच कमालीची प्रसिद्धी मिळवली होती. अवघ्या 28 व्या वर्षी त्यानं अनेक विजेतेपदं मिळवली होती. संपूर्ण कारकीर्द डोळ्यांसमोर असताना इतक्या कमी वयात त्याचं निधन होणं ही बाबप अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली.