Third umpire Shocking Call Controversy : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा टी-ट्वेंटी सामना (BAN vs SL 2nd T20I) खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने दिलेलं 165 धावांचं आव्हान पार करता बांगलादेशने सहज विजय मिळवला. मात्र, या सामन्यात थर्ड अंपायरचा एक निर्णय वादात सापडला आहे. बांग्लादेशचा डाव सुरू असताना सलामीवीर सौम्या सरकार (Soumya Sarkar) याला ज्याप्रकारे नॉट आऊट जाहीर केलं, ते पाहून श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगलाच वाद घातला. त्यामुळे सामना पाच मिनिट थांबवण्यात देखील आला होता. नेमकं काय झालं ते व्हिडीओमधून पाहूया...
पाहा Video
- A DRS drama now, On field umpire gives out, but 3rd umpire says Not Out despite the Edge. pic.twitter.com/yElPSUYc2l
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 6, 2024
अंपायरने नॉट आऊट का दिलं?
थर्ड अंपायर असलेल्या मसुदुर रहमान यांनी सुचवलं की स्पाइक काठाच्या विरूद्ध बाहेरील आवाजातून आला होता आणि बॅट आणि बॉलमध्ये स्पष्ट अंतर असल्याचं त्यांनी नमूद केलं. वादाचा मुद्दा असा होता की जेव्हा स्पाइक दिसून आला तेव्हा चेंडू बॅटच्या पुढे गेला होता. त्यामुळे आता व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की, सौम्या सरकार आऊट आहे की नॉट आऊट?
अवघड धावसंख्येचा पाठलाग करताना, सौम्या सरकार आणि लिटन दास यांनी लंकेच्या गोलंदाजांना धुतलं अन् बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पॉवरप्लेमध्ये 63 धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. तौहीद हृदयोय आणि नजमुल हुसेन शांतो यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांच्या भागीदारीने यजमानांसाठी विजयावर शिक्कामोर्तब केलं. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 53 धावा केल्याने संघासाठी ही सर्वाधिक धावसंख्या होती.
बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन) - नजमुल हुसेन शांतो (C), लिटन दास (WK), सौम्या सरकार, तौहिद हृदोय, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) - अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (WK), कामिंडू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंक (C), अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश थेक्षाना, दिलशान मदुशांका, बिनूरा पट्टाना फेरनंद, बिनबुरा .