Dinesh Karthik चं हेल्मेट इतरांपेक्षा वेगळं का? अखेर कारण समोर आलंच...!

तुम्हाला माहितीये का दिनेश कार्तिक इतर फलंदाजांपेक्षा वेगळं हेल्मेट का घालतो?

Updated: Sep 29, 2022, 09:57 AM IST
Dinesh Karthik चं हेल्मेट इतरांपेक्षा वेगळं का? अखेर कारण समोर आलंच...! title=

Dinesh Karthik Helmet: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मैदानावर त्याच्या स्फोटक फलंदाजीव्यतिरिक्त, दिनेश कार्तिक त्याच्या हेल्मेटच्या निवडीसाठी देखील प्रसिद्ध आहे. दिनेश कार्तिकचं हेल्मेट सर्वात वेगळे आणि स्टायलिश आहे. दिनेश कार्तिक जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी किंवा यष्टिरक्षणासाठी मैदानात जातो तेव्हा चाहत्यांच्या नजरा त्याच्या हेल्मेटवर असतात. मात्र तुम्हाला माहितीये का दिनेश कार्तिक इतर फलंदाजांपेक्षा वेगळं हेल्मेट का घालतो.

दिनेश कार्तिक जे हेल्मेट वापरतो ते बेसबॉल किंवा अमेरिकन फुटबॉल टूर्नामेंटमध्ये घातलेल्या हेल्मेटसारखंच आहे. जर तुम्ही दिनेश कार्तिकचे हेल्मेट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, त्याचं हेल्मेट गोल नसून त्याच्या हेल्मेटला छोटी छिद्र आहेत.

हे हेल्मेट अगदी वेगळे आणि वजनाने हलके आहेत. दिनेश कार्तिक सुरुवातीपासूनच हलक्या हेल्मेटला प्राधान्य देतो कारण त्याला फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगही करावं लागतं. त्याच वेळी, या विशेष हेल्मेटवर लहान छिद्रे आहेत, ज्याच्या मदतीने हवा खेळती राहून आणि घामाने भिजण्याचा प्रश्न येत नाही. 

याशिवाय दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतरांपेक्षा डोक्यावर चांगलं फीट होतं. जुन्या काळातील इंग्लंडचे माजी फलंदाज जेम्स टेलर, मायकेल कॅरबेरी तसेच श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा देखील हे हेल्मेट वापरायचे.

37 वर्षीय दिनेश कार्तिकने दीर्घ काळानंतर टीम इंडियाच्या T20 मध्ये कमबॅक केलं आहे. परत आल्यापासून दिनेश कार्तिक फिनिशरच्या भूमिकेत दिसतोय.