मुंबई विरुद्ध पराभवानंतर धोनी दु:खी, म्हणाला, 'हे पाहून दु:ख होते'

धोनीने पुढच्या सीजनसाठी आताच केली ही घोषणा

Updated: Oct 24, 2020, 08:59 AM IST
मुंबई विरुद्ध पराभवानंतर धोनी दु:खी, म्हणाला, 'हे पाहून दु:ख होते' title=

शारजाह : 11 पैकी आठ सामने गमावल्यामुळे आयपीएल 2020 च्या प्लेऑफच्या शर्यतीत जवळपास बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, पुढचं वर्ष डोळ्यासमोर ठेवून उर्वरित तीन सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.'

मुंबई इंडियन्सकडून 10 विकेटने पराभवानंतर धोनी म्हणाला, 'अशा कामगिरीने दुखावला जातो. चूक कोठे झाली ते पहावे लागेल. हे आमचे वर्ष नव्हते. आपण आठ किंवा दहा विकेट्ने हारलो याने काही फरक पडत नाही परंतु स्पर्धेत तुम्ही कुठे आहेत हे पाहावं लागतं. हेच दु:खी करतं.'

धोनी म्हणाला, 'आम्हाला दुसऱ्या सामन्यापासूनच बघायचं होतं की, चूक कुठे होतेय. रायुडूला दुखापत झाली. उर्वरित फलंदाज त्यांचे दोनशे टक्केही देऊ शकले नाहीत. नशिबानेही आम्हाला साथ दिली नाही. ज्या सामन्यांमध्ये आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती तेथे आम्हाला नाणेफेक जिंकता आले नाही. जेव्हा आम्ही प्रथम फलंदाजी केली. तेव्हा दव होता.'

धोनी म्हणाला, "खराब कामगिरीसाठी शंभर निमित्त दिले जाऊ शकते, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या क्षमतेत सर्वोत्कृष्ट खेळू शकतो का हे स्वतःला विचारावे लागेल." आम्ही आतापर्यंत आमच्या रेकॉर्डनुसार खेळलो का, नाही, आम्ही प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही'.

पुढील वर्षासाठी स्पष्ट चित्र असणे फार महत्वाचे आहे, असे देखील धोनी म्हणाला.

'पुढच्या वर्षी बरेच असे तसे असतील. येत्या तीन सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना पाहिलं जाईल. पुढचं वर्षं लक्षात ठेवून डेथ ओव्हर्समध्ये कोण चांगली गोलंदाजी करू शकेल आणि फलंदाजीच्या दबावाला कोण रोखू शकेल हे पाहिलं जाईल. पुढील तीन सामन्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना घेतलं जाईल.'