धोनीने आयपीएलमध्ये बनवला आणखी एक रेकॉर्ड

आयपीएलमध्ये धोनीचा आणखी एक रेकॉर्ड

शैलेश मुसळे | Updated: May 5, 2018, 09:06 PM IST
धोनीने आयपीएलमध्ये बनवला आणखी एक रेकॉर्ड title=

मुंबई : धोनीने स्टंपिंगच्या बाबतीत एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. धोनीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये त्याने एकूण 32 स्टंपिंग करत हा रेकॉर्ड बनवला आहे. कोलकाताचा उपकर्णधार रॉबिन उथप्पाने देखील 32 स्टंपिंग केले आहेत. दिनेश कार्तिक 28 स्टंपिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे तर रिद्धिमान साहा याने 18 स्टंपिंग केले आहेत. 16 स्टंपिंग अॅडम गिलक्रिस्टच्या नावावर आहेत. तर 14 स्टंपिंगसह पार्थिव पटेल पांचव्या स्थानावर आहे.
 
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या विकेटकीपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. विकेटकीपिंगमध्ये अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले आहेत. धोनीने शनिवारी एबी डिविलियर्सला खूपच शानदारपणे स्टपिंग करत आऊट केलं. डिविलियर्सने 3 बॉलमध्ये 1 रन केला. हरभजन सिंगच्या बॉलवर धोनीने डिविलियर्सला माघारी पाठवलं. डिविलियर्स या विकेटमुळे चेन्नईला नक्कीच विजय सोपा झाला. या 35 व्या सामन्यामध्ये चेन्नईने बंगळुरुवर विजय मिळवला.