पुणे : आयपीएल 2018 मध्ये चेन्नईकडून खेळणारा अंबाती रायडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रायडूने या सीजनमध्ये चेन्नईसाठी 48.63 च्या रनरेटने 535 रन केले आहेत. हैदराबाद विरुद्ध रायडूने शानदार शतक ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. रायडूने आयपीएलमध्ये पहिलं शतक ठोकलं आहे. शतक पूर्ण होण्यापूर्वी रायडूची विकेट पडता पडता वाचली होती. जेव्हा तो 98 रन खेळत होता तेव्हा त्याने हवेत एक शॉट खेळला पण बॉल खेळाडू पर्यंत पोहचू शकला नाही. त्यातच लगेच धोनी त्याच्याकडे गेला आणि एक रन घेत शतक पूर्ण करण्याठी सांगितलं.
अंबाती रायडूने आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये सर्वाधिक रन केले आहे. आतापर्यंत त्याने 2 अर्धशतक केले आहेत तर 1 शतक ठोकलं आहे. अंबाती रायडूने 5 सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. त्याने यंदा चेन्नई संघात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या सीजनमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. मुंबईकडून त्याला फक्त 5 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 5 सामन्यांमध्ये त्याने फक्त 91 रन केले होते. त्यामुळे मुंबईने यंदा त्याला आपल्या टीममध्ये घेतलं नव्हतं. पण यंदाच्या सीजनमधला तो सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे.