सुर्यकुमार यादवने Dhanashree Verma सोबत फोटो पोस्ट करत चहलला डिवचलं

'त्या रात्री तुला मिस...' Dhanashree Verma सोबतचा फोटो पोस्ट करत असं का म्हणाला Surykumar Yadav 

Updated: Aug 13, 2022, 02:36 PM IST
सुर्यकुमार यादवने Dhanashree Verma सोबत फोटो पोस्ट करत चहलला डिवचलं  title=

मुंबई : टीम इंडियाचा ज्यूनियर संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, तर सिनियर संघ आशिया कपच्या   (Asia cup) तयारीला लागला आहे. या दरम्यान टीम इंडियाचे (Team India) अनेक खेळाडू मजा मस्ती करताना दिसत आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवताना दिसतोय. तर अनेक खेळाडू मिळून एऩ्जॉय करताना दिसत आहे. त्यात आता सुर्यकुमार यादवने (Surykumar yadav) पोस्ट केलेल्या या फोटोची चर्चा रंगली आहे. या फोटोत नेमकं काय आहे ते जाणून घेऊय़ात.  

टीम इंडियाचा तडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) मैदानासह सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह असतो. सोशम मीडियावर देखील पोस्ट टाकून तो बॅटींग करत असतो. आता अशीच एक त्याची पोस्ट चर्चेत आली आहे.  

पोस्टमध्ये काय? 
सुर्यकुमार यादवने (Surykumar yadav) इन्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) आणि त्याची बायको देविशा शेट्टी दिसत आहे. या मॅरीड कपलसोबत श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील फोटोत पोझ देताना दिसत आहे.मात्र या फोटोत एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे याl धनश्री वर्माचा (Dhanashree Verma) नवरा म्हणजेच टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal)  दिसत नाहीए.  

कॅप्शनमध्ये काय म्हणाला? 
सुर्यकुमार यादवने (Surykumar yadav)  या इन्टाग्राम स्टोरीला कॅप्शन लिहिताना युझवेंद्र चहलला (yuzvendra chahal) डिवचलं आहे. या स्टोरीमध्ये सुर्यकुमार यादव म्हणाला, माफ कर युझवेंद्र चहल 'आम्ही तुला मिस केलं नाही'. असे कॅप्शन लिहून त्याने चहलला एकप्रकारे उसकावण्याचा प्रयत्न केला आहे. या सोबत त्याने काल रात्रीचा हा प्रसंग असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. 

दरम्यान टीम इंडियाचा झिम्बाब्वे विरूद्ध पहिला वनडे सामना हा 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.