Delhi Capitals In IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात (IPL Point Table) आता 12 गुण आहेत. त्यामुळे कोलकाताने प्लऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. कोलकाताचा नेट रननेट आता 1.096 झाला आहे. तर दुसरीकडे दिल्लीची या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या स्थानावर घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली भलेही 6 व्या क्रमांकावर असेल, पण दिल्लीसाठी आता प्लेऑफ गाठणं (Playoffs scenario) अवघड झालंय. दिल्लीसाठी आता एक पराभव म्हणजे खेळ खल्लास असंच समीकरण असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 12 गुण आणि +1.096 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे तर दिल्ली कॅपिटल्स 10 आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीसाठी आता गणित खूप किचकट झालाय. दिल्लीचे आता 3 सामने राहिले आहेत. दिल्लीने जरी तिन्ही सामने जिंकले तरी देखील त्यांना प्लेऑफसाठी संघर्ष करावा लागेल. दिल्लीला उर्वरित तीन सामन्यात आपला नेट रननेट सुधारावा लागणार आहे. दिल्लीचा आगामी सामना टेबल टॉपर राजस्थानविरुद्ध आहे. त्यामुळे दिल्लीचं पाणीपत होणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
आरसीबी आणि लखनऊ यांच्याविरुद्ध देखील दिल्लीचा आमना सामना होणार आहे. हे दोन्ही सामने दिल्लीसाठी सोपी असतील. पण राजस्थानचा सामना दिल्लीसाठी खऱ्या अर्थाने अटीतटीचा असणार आहे. त्यामुळे आता ऋषभच्या नेतृत्वात दिल्ली प्लेऑफची बॉर्डर पार करणार का? असा सवाल विचारला जात आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 16.3 षटकांत तीन गडी गमावून 157 धावा केल्या आणि सामना सात गडी राखून जिंकला.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.