WPL 2024 Final : लेडी सेहवागच्या तडाख्यात घावली गुजरात जायंट्स, Delhi Capitals ची फायनलमध्ये एन्ट्री

Delhi Capitals Into the Final : दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शफाली वर्माच्या (Shafali Verma) झंझावाती खेळीमुळे गुजरातच्या पोरींचा धुव्वा उडाला. सेफालीने 37 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली.

सौरभ तळेकर | Updated: Mar 13, 2024, 11:57 PM IST
WPL 2024 Final : लेडी सेहवागच्या तडाख्यात घावली गुजरात जायंट्स, Delhi Capitals ची फायनलमध्ये एन्ट्री title=
Delhi Capitals Into the WPL 2024 Final

Delhi Capitals Beat Gujarat Giants : वुमेन्स प्रिमियर लीगच्या फायनलमध्ये आता दिल्ली कॅपिटल्सने एन्ट्री मारली आहे. साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या शेफाली वर्माने (Shafali Verma) गुजरात जायंट्सचा खेळ खल्लास केला अन् थाटात फायनलचं तिकीट बुक केलंय. दिल्लीच्या विजयाने आता मुंबईला प्लेऑफमध्ये आणखी मेहनत करावी लागणार आहे. दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शफाली वर्माच्या झंझावाती खेळीमुळे गुजरातच्या पोरींचा धुव्वा उडाला. सेफालीने 37 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली. ज्यामध्ये 7 फोर अन् 5 गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. शेफालीने टीमला फायनलमध्ये (Delhi Capitals Into the Final) पोहोचवल्यानंतर आता प्लेऑफमध्ये (WPL 2024 Playoff) कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

गुजरात जायट्सला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातने 20 ओव्हरमध्ये केवळ 129 धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिले 5 फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. त्यामुळे गुजरातची परिस्थिती 48 वर 5 विकेट्स अशी झाली होती. त्यानंतर भारती फुलमाली 42 धावांची खेळी करून गुजरातला सावरलं होतं. पण संपूर्ण संघ 129 धावाच करु शकला. 130 धावांचं आव्हान पार करताना दिल्लीने मात्र तडफदार सुरूवात केली. सलामीवीर शेफाली वर्माने प्रत्येक गोलंदाजाला चांदण्या दाखवल्या. तर दुसरीकडे जेमिमाह रॉड्रिग्स शेफालीला मोलाची साथ दिली. शेफालीच्या वादळासमोर गुजरातचे गोलंदाज घामाघूम झाले अन् शेफालीने 14 व्या ओव्हरमध्येच काम फत्ते केलं.

दिल्लीविरुद्ध फायनलमध्ये कोण?

दिल्ली कॅपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतल्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघात म्हणजे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात प्लेऑफचा सामना होणार आहे. 15 मार्च रोजी हा सामना खेळवला जाईल. मागील सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव करून फायनलची वाट अडवली होती. आता मुंबई याचा वचपा काढणार का? असा सवाल विचारला जात आहे.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), दयालन हेमलथा, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम मो. शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.