चेन्नई : आयपीएलच्या १२ व्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान दररोज नवनवीन रेकॉर्ड केले जातात आणि मोडीत देखील निघतात. असाच एक रेकॉर्ड चेन्नईचा मध्यमगती बॉलर दीपक चहरच्या नावे झाला आहे. एका मॅचमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड दीपक चहरने आपल्या नावे केला आहे.
Signing off the night with this fabulous record Cherry created last knight! Previous best was 19 dots by Ashish Nehra, Munaf Patel and Fidel Edwards, all created 10 years ago! #WhistlePodu #Yellove #CSKvKKR pic.twitter.com/e6cr4IcnjA
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2019
कोलकाता विरुद्ध ९ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये चहरने ही कामगिरी केली आहे. दीपकने एकूण ४ ओव्हर बॉलिंग करत २० रनच्या मोबदल्यात ३ विकेट मिळवले. तर तब्बल २० बॉल डॉट टाकले. चहरने कोलकाताच्या टॉप ऑर्डरला माघारी पाठवले. चहरने क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, नितीश राणा या तिघांची विकेट घेतली. स्फोटक खेळी करणाऱ्या क्रिस लेनिनला त्याने 0 वर एलबीडबल्यू केले. यानंतर चहरने क्रमश: तिसऱ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये नीतीश राणाला 0 तर रॉबिन उथप्पाला ११ रनवर आऊट केले.
यानंतर मैदानात आलेल्या आंद्रे रसेलला देखील दीपक चहरने फार चांगल्या प्रकारे बॉलिंग केली. त्याने रसेलला केलेल्या ओव्हरमधील ५ बॉल डॉट टाकले. यामुळे एकूणच त्याने टाकलेल्या ४ ओव्हरमधून म्हणजेच २४ बॉलमधून त्याने २० बॉल डॉट टाकले.
कोलकाता विरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये चेन्नईने ७ विकेटने विजय मिळवला. चेन्नईचा आज राजस्थान विरुद्ध सामना रंगणार आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या ६ मॅचपैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नई अंकतालिकेत १० पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
याआधी सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉ़र्ड हा संयुक्तपणे पंजाबचा बॉलर अंकित राजपूत आणि हैदराबादचा स्पीनर रशिद खान या दोघांच्या नावे होता. या दोघांनी प्रत्येकी १८ डॉट बॉल टाकण्याची कामगिरी केली होती.