टीममध्ये आधीच 2 विकेटकीपर बॅट्समन, तरीही दिनेश कार्तिकला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी? पाहा कसं

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत आरसीबीचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शानदार कामगिरी केली आहे. 

Updated: Apr 17, 2022, 05:09 PM IST
टीममध्ये आधीच 2 विकेटकीपर बॅट्समन, तरीही दिनेश कार्तिकला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी? पाहा कसं title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत आरसीबीचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शानदार कामगिरी केली आहे. कार्तिकने या मोसमात फिनीशरची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. तसेच प्रत्येक  सामन्यानंतर कार्तिकचा खेळ आणखी बहरतोय. क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा फिटनेस महत्त्वाचा असतो. एका वयानंतर शरीर अपेक्षित साथ देत नाही.  एका वेळेनंतर क्रिकेटसाठी आवश्यक असा फिटनेस राहत नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू हे निवृत्ती घेतात.

ज्या वयात अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा मार्ग स्वीकारला, त्या वयात कार्तिकला पुन्हा एकदा टीम इंडिया खुणावतेय. दिनेशला टीम इंडियामध्ये कमबॅक करायचंय. इतकंच नाही, तर तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र ऋषभ पंत आमि केएल राहुलसारखे विकेटकीपर बॅट्समन टीममध्ये आहेत. त्यामुळे कार्तिकला टीममध्ये संधी मिळणं काहीसं अवघड आहे.

कार्तिकला टीममध्ये संधी कशी मिळणार? 

टीममध्ये केएल आणि ऋषभ हे दोघे विकेटकीपर आहेत. या दोघांना आयपीएलमध्ये कॅप्टन्सीचा अनुभवही आहे. त्यामुळे कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता नाही. मात्र न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूल यांनी एक मार्ग सांगितलाय ज्यामुळे कार्तिकला संधी मिळू शकते.

डूल काय म्हणाले? 

"या वर्षी डीकेच्या ऑस्ट्रेलियाला जाण्याबाबत विचार करत होतो. टीम इंडियाला बॅकअप कीपरच्या रुपात ऋषभ आणि केएल भेटले आहे. तुम्ही डीकेला घेऊन जाऊ शकत. पण डीकेचा टीममध्ये बॅकअप बॅट्समन म्हणून समावेश केला जाऊ शकतो. कार्तिक 6 व्या किंवा 7 व्या.. इतकंच नाही, तर तो 5 व्या क्रमांकारही खेळू शकतो.  कार्तिक सध्या चांगल्या आत्मविश्वासासह खेळतोय", असं डूल म्हणाले. 

दिल्लीविरुद्ध कार्तिकचा धमाका

कार्तिकने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 34 बॉलमध्ये 66 धावांची नाबाद  वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 5 सिक्स आणि 5 फोर खेचले. कार्तिकने आरसीबी अडचणीत असताना निर्णायक क्षणी टीमचा डाव सावरला. कार्तिकने एका फिनीशरची भूमिका चोखपणे पार पाडली. कार्तिकने 18 व्या ओव्हरमधील प्रत्येक बॉल हा बाउंड्रीलाईनच्या बाहेरच मारला.