David Warner: काही गोष्टींना पुढे सारून...; जॉनसनच्या कठोवर टीकेवर वॉर्नरचं प्रत्युत्तर

David Warner Statement: काही दिवसांपूर्वी मिचेल जॉन्सनने 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'च्या कॉलममध्ये डेव्हिड वॉर्नरवर टीका करत त्याच्या निवृत्तीबाबत लिहिलं होतं. दरम्यान यावर आता वॉर्नरने मौन सोडलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 9, 2023, 09:59 AM IST
David Warner: काही गोष्टींना पुढे सारून...; जॉनसनच्या कठोवर टीकेवर वॉर्नरचं प्रत्युत्तर  title=

David Warner Statement: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मिचेल जॉनसन यांच्यात काहीसा वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी मिचेल जॉन्सनने 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'च्या कॉलममध्ये डेव्हिड वॉर्नरवर टीका करत त्याच्या निवृत्तीबाबत लिहिलं होतं. दरम्यान यावर आता वॉर्नरने मौन सोडलं आहे. 

जॉनसनने या कॉलममध्ये लिहिलं होतं की, 'आम्ही डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीच्या सिरीजची तयारी करत असताना, मला कोणी सांगू शकेल का? संघर्ष करणाऱ्या टेस्ट ओपनरला स्वतःच्या निवृत्तीची तारीख ठरवण्याची संधी का मिळाली? ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या स्कँडलमध्ये अडकलेल्या खेळाडूला हिरोप्रमाणे निवृ्त्तीची संधी का मिळते?

वॉर्नरने दिलं प्रत्युत्तर

याबाबत डेव्हिड वॉर्नरने उत्तम दिलं असून तो म्हणाला म्हणाला, 'प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. या गोष्टींना पुढे सारून आम्ही पुढच्या टेस्ट सामन्यांची वाट पाहत आहोत. जॉन्सनच्या  टीकेसमोर हार न मानण्याचं मी फार पूर्वीच शिकलो आहे.

वॉर्नर पुढे म्हणाला की, 'माझ्या आई-वडिलांनी मला लढायला आणि मेहनत करायला शिकवलं. मला वाटतं की, आज तुम्ही जे पाहताय ते अधिक महत्त्वाचे आहे, लोक क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतयात.

टेस्टमध्ये कशी आहे वॉर्नरची कामगिरी

उन्हाळ्यानंतर डेव्हिड वॉर्नरने 25 सामन्यांमध्ये केवळ एक टेस्ट शतक झळकावले आहे. 2022 च्या उत्तरार्धात MCG मधील त्याच्या 100 व्या टेस्ट सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं.  

 2018 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन बॉल-टेम्परिंग प्रकरणाला सॅंडपेपरगेट स्कँडल असंही म्हणतात. मार्च 2018 मध्ये, न्यूलँड्स, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या टेस्ट दरम्यान, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट बॉल स्विंग करण्यासाठी सॅंडपेपरने एका बाजूने खडबडीत करण्याचा प्रयत्न करत असताना टीव्ही कॅमेराने स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना पकडलं होतं. 

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ (PAK vs AUS)

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.