IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनं मोडला सचिन आणि द्रविडचा खास रेकॉर्ड

CSK संघ हरला मात्र धोनीच्या या रेकॉर्डनं जिंकली चाहत्यांची मनं, सचिन-द्रविडलाही टाकलं मागे

Updated: Mar 27, 2022, 01:55 PM IST
IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनं मोडला सचिन आणि द्रविडचा खास रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा शुभारंभ चेन्नई विरुद्ध कोलकाता संघाच्या सामन्याने झाला. चेन्नईचा 6 विकेट्सनं पहिल्यात सामन्यात पराभव झाला आहे. महेंद्रसिंह धोनी या सामन्यात तुफान फलंदाजी करताना दिसला. धोनीनं या सामन्यात अर्धशतक झळकवलं.

महेंद्रसिंह धोनीनं सचिन आणि द्रविडचा रेकॉर्ड आपलं अर्धशतक करून पूर्ण केला. धोनीच्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे. थालाची बॅट पहिल्याच सामन्यात तुफान चालल्याचं पाहायला मिळालं. 

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीनं दमदार अर्धशतक झळकवलं. त्याने 38 बॉलमध्ये 50 धावांची खेळी खेळली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने तुफान फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. धोनीचा हा फॉर्म तीन वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळाला. धोनीनं यासोबत खास विक्रमही मोडला आहे.

आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा तो सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला. धोनीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 40 वर्षे 262 दिवसांत अर्धशतक ठोकलं. त्याच्या आधी राहुल द्रविडने 40 वर्षे 116 दिवसांत आयपीएल 50 तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 39 वर्षे 362 दिवसांत आयपीएल अर्धशतक झळकवलं होतं.

महेंद्रसिंह धोनीला गेल्या हंगामात तर खेळाताना फार कमीवेळा पाहायला मिळालं. आता धोनीनं यंदाच्या हंगामात कर्णधारपद जडेजाकडे सोपवलं आहे. त्याचा पूर्ण फोकस आता फलंदाजीवर असल्याचं नुकत्याच झालेल्या सामन्यातून दिसलं. 

धोनीचा हा फॉर्म पाहून चाहत्यांना खूप मोठा आनंद झाला आहे. चेन्नईचा पराभव झाला तरी चाहत्यांना धोनीचा हा फॉर्म पाहून आनंद झाला आहे. कोलकाता संघाने मात्र धोनीच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. 6 विकेट्सनी चेन्नई संघाला पराभूत केलं.